सांगलाने पोलिसांना मागितला वेळ
By Admin | Updated: September 10, 2015 03:45 IST2015-09-10T03:45:12+5:302015-09-10T03:45:12+5:30
फायनान्स कंपनीची नऊ कोटी रुपयाने फसवणूक करणारे आरोपी उद्योजक यशवंत सांगला

सांगलाने पोलिसांना मागितला वेळ
नागपूर : फायनान्स कंपनीची नऊ कोटी रुपयाने फसवणूक करणारे आरोपी उद्योजक यशवंत सांगला आणि त्यांचा मुलगा गौरव शहराबाहेर असल्याचे कारण सांगून पोलिसांना वेळ मागितला आहे.
गुन्हे शाखा पोलिसांनी सांगला, त्यांचा मुलगा आणि पत्नीच्या विरुद्ध इंडिया इन्फोलाईन फायनान्सकडून कर्ज घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी रात्री आर्थिक गुन्हे शाखेने सांगला यांच्या सिव्हील लाईन्स येथील बंगल्यावर धाडही टाकली होती. परंतु तेथून पोलिसांना कुठलेही महत्त्वपूर्ण दस्तऐवज हाती लागले नाहीत. पोलिसांनी सांगलाच्या कुटुंबीयांना नोटीस देऊन आरोपींना गुन्हे शाखा कार्यालयात पाठवण्यास सांगितले होते.
सूत्रानुसार बुधवारी आरोपींनी वकिलाच्या माध्यमातून पोलिसांना आपण शहराबाहेर असल्याची माहिती दिली. आरोपी न्यायालयात गेल्याचीही माहिती उघडकीस आली आहे. सांगला कुटुंब अनेक दिवसांपासून आर्थिक संकटात आहे. त्यांच्या बहुतेक संपत्ती शासकीय विभागाच्या ताब्यात आहे. (प्रतिनिधी)