संघदान, बुद्धमूर्ती दान समाराेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:39 IST2021-02-05T04:39:19+5:302021-02-05T04:39:19+5:30

कन्हान : अहिल्याबाई होळकर बहुद्देशीय शिक्षणसंस्था नागपूर व बुद्धिस्ट ऑर्गनायझरच्या संयुक्त विद्यमाने वैशाख पाैर्णिमेनिमित्त २६ मे राेजी संघदान व ...

Sanghdan, Buddhamurti Dan Samareh | संघदान, बुद्धमूर्ती दान समाराेह

संघदान, बुद्धमूर्ती दान समाराेह

कन्हान : अहिल्याबाई होळकर बहुद्देशीय शिक्षणसंस्था नागपूर व बुद्धिस्ट ऑर्गनायझरच्या संयुक्त विद्यमाने वैशाख पाैर्णिमेनिमित्त २६ मे राेजी संघदान व बुद्धमूर्ती दान कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले आहे, अशी माहिती सुरेश गायकवाड यांनी दिली.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काॅंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना निमंत्रण देण्यात आले असून, त्यांचा गगन मलिक यांच्या हस्ते पंचशील ध्वज व बुद्धरूप देऊन गाैरव करण्यात आला. वैशाख पाैर्णिमा हा दिवस संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने संपूर्ण जगात बेशाक डे म्हणून साजरा केला जाताे. त्यामुळे कन्हान येथे संघदान व बुद्धमूर्ती दान कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आल्याचेही सुरेश गायकवाड यांनी सांगितले. यावेळी नितीन गजभिये, भीमराव हत्तीहंबिरे, सिद्धार्थ हत्तीहंबिरे उपस्थित होते. ( बुद्धरूप म्हणजे काय?)

Web Title: Sanghdan, Buddhamurti Dan Samareh