शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

संघ, आई आणि विद्यार्थी परिषद यांनी मला घडवले : नितीन गडकरी यांची पुस्तक प्रकाशनावेळी भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 13:01 IST

Nagpur : गडकरी यांच्या ‘संघातील मानवी व्यवस्थापन’ पुस्तकाचे प्रकाशन सोहळा थाटात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोक आधी भारतावर विश्वास ठेवत नव्हते. परंतु, अलीकडच्या काही घडामोडींमधून क्षमता सिद्ध झाल्यामुळे लोक भारतावर विश्वास ठेवायला लागले आहेत. परिणामी, जगाचाही भारतावरील विश्वास वाढला आहे. भारत अशक्य ते शक्य करू शकतो, हे सर्वांना कळून चुकले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी केले.

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या 'संघातील मानवी व्यवस्थापन' या पुस्तकाचे शुक्रवारी आंबेकर आणि ज्येष्ठ संपादक व विचारवंत विवेक घळसासी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. हा कार्यक्रम राजहंस प्रकाशन व मंथन व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने गोरेपेठेतील वनामती सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता. व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनामध्ये चारित्र्याला खूप महत्व आहे. देशामध्ये आधी शुद्ध चारित्र्याचे लोक होते. त्यामुळे हा देश हजारो वर्षापर्यंत एकसंघ राहू शकला. म्हणूनच संघ चारित्र्यवान व्यक्ती निर्माण करण्याचे कार्य करतो. असे व्यक्तीच देशाला सर्वश्रेष्ठ बनवू शकतात. स्वतःच्या स्वार्थाचा विचार करणाऱ्यांमुळे परिवारच एकत्र राहू शकत नाही, देश व संघटना तर दूरची गोष्ट आहे, असेही आंबेकर यावेळी म्हणाले.

घळसासी यांनी वर्तमान राजकीय नेत्यांमध्ये वैचारिक प्रगल्भता दिसून येत नसल्यामुळे खंत व्यक्त केली. आज बहुतेक नेत्यांना संगीत, साहित्य व नाट्यामध्ये रुची नाही. ते वाचन करीत नाहीत. वैचारिक चर्चा करीत नाहीत. त्यामुळे अनेकांची अभिव्यक्ती उथळ व बटबटीत वाटते. असे नेते देशाची जडणघडण करू शकत नाही, असे त्यांनी सांगितले. राजहंस प्रकाशनचे संचालक नरेश सबजीवाले यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले तर, आशुतोष अडोणी यांनी संचालन केले.

राष्ट्र सर्वोतोपरी, ते समृद्ध व्हावेमाझ्याकरिता राष्ट्रच सर्वोतोपरी असून, ते समृद्ध व्हावे, हीच माझी नेहमी इच्छा असते, अशी भावना नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. माझे जीवन आई, संघ आणि विद्यार्थी परिषदेमुळे घडले. कार्य, कर्तृत्व, जीद्द, चिकाटी, संवेदनशीलता, सहृदयता, समभाव आदी गुण या तिघांमुळेच मिळाले. त्यातून मी देशहिताकरिता उल्लेखनीय कामे करू शकलो. देश व समाजाकरिता काम करण्याची इच्छा असली की काहीच अशक्य राहत नाही. जगात जे काही चांगले आहे, ते सर्व भारतात आले पाहिजे आणि सर्वजन सुखी झाले पाहिजे, असे मला नेहमी वाटते, असे गडकरी यांनी सांगितले. विचारशून्यता ही आज देशाची मोठी समस्या आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीnagpurनागपूरRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ