संदीप ताजने बसपाचे प्रदेशाध्यक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 20:22 IST2019-10-26T20:21:38+5:302019-10-26T20:22:40+5:30
बसपाच्या प्रदेशाध्यक्षपदी अॅड. संदीप ताजने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी शनिवारी दिल्ली येथील पक्षाच्या कार्यालयात महाराष्ट्र प्रदेशाची कार्यकारिणी बरखास्त करीत अॅड. ताजने यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली.

संदीप ताजने बसपाचे प्रदेशाध्यक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बसपाच्या प्रदेशाध्यक्षपदी अॅड. संदीप ताजने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी शनिवारी दिल्ली येथील पक्षाच्या कार्यालयात महाराष्ट्र प्रदेशाची कार्यकारिणी बरखास्त करीत अॅड. ताजने यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली.
यासोबतच राज्यातील सर्व झोन, जिल्हा, शहर व विधानसभा कमिट्यासुद्धा बरखास्त करण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्याची लवकरच नव्याने कार्यकारिणी बनविण्यात येईल अशी माहिती नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष संदीपजी ताजने यांनी दिली.
अॅड. ताजने हे बसपाचे प्रदेश प्रभारी म्हणून काम पाहत होते. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर सुरेश साखरे यांना नुकतेच प्रदेशाध्यक्षपदावरून निलंबित करण्यात आले. त्यांनी स्वत:ही पराभवाची नैतिक जबाबदारी घेऊन आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे.