नागपूर महानगरपालिकेचे नवे महापौर म्हणून संदीप जोशी यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 13:10 IST2019-11-22T12:04:37+5:302019-11-22T13:10:10+5:30
नागपूर महानगरपालिकेचे नवे महापौर म्हणून भाजपचे संदीप जोशी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना १०४ मते मिळाली आहेत.

नागपूर महानगरपालिकेचे नवे महापौर म्हणून संदीप जोशी यांची निवड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: नागपूर महानगरपालिकेचे नवे महापौर म्हणून भाजपचे संदीप जोशी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना १०४ मते मिळाली आहेत. शुक्रवारी झालेल्या बैठकीत मतदान घेण्यात आले होते. यात जोशी यांच्या विरोधात असलेल्या काँग्रेसच्या हर्षला साबळे यांना २६ तर बसपाच्या मोहम्मद इब्राहिम यांना १० मते मिळाली आहेत. बाल्या बोरकर हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे या बैठकीस अनुपस्थित राहिले. तसेच काँग्रेसचे निषाद मुमताज, बंटी शेळके, गार्गी चोप्रा व रश्मी धुर्वे अनुपस्थित होते. याखेरीज शिवसेनेचे किशोर कुमेरिया, अपक्ष आभा पांडे अनुपस्थित राहिले.
उपमहापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या मनीषा कोठे यांना विजयी घोषित करण्यात आले. कोठे यांना 104 तर राष्ट्रवादीचे दुनेश्वर पेठे यांना 26, बसपाच्या मंगला लाण्जेवार यांना 10 मते मिळाली.