शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

रेतीच्या ट्रकने चौघांना चिरडले

By admin | Updated: March 31, 2016 03:14 IST

सर्व्हिस रोडने राँग साईडने रेती भरून येणाऱ्या भरधाव ट्रकने चौघांना उडविले. त्यात घटनास्थळीच आजीसह तीन नातवंडांचा मृत्यू झाला.

कामठी : सर्व्हिस रोडने राँग साईडने रेती भरून येणाऱ्या भरधाव ट्रकने चौघांना उडविले. त्यात घटनास्थळीच आजीसह तीन नातवंडांचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास नागपूर - जबलपूर मार्गावरील नेरी गावालगत झाला. या अपघातामुळे संतापलेल्या नागरिकांनी ट्रकचालकाला झाडाला बांधून ठेवले. त्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन केले. या अपघातामुळे साठे कुटुंबावर शोककळा पसरली.देवलबाई रणछोडदास साठे (६०), काजल रण्णू साठे (७), रामू रण्णू साठे (३) आणि जया रण्णू साठे (१) सर्व रा. जुनापाणी, ता. हिंगणा अशी मृत आजी - नातवंडांची नावे आहेत. आरोपी ट्रकचालकाचे नाव अशोक उत्तम शेंडे (२९, रा. माहुली, ता. पारशिवनी) असे आहे. तो एमएच-३१/डब्ल्यू-३४९२ क्रमांकाच्या ट्रकमध्ये नेरी रेतीघाटातून रेती भरून कामठीकडे येत होता. त्याचवेळी नागपूर-जबलपूर बाह्यवळण मार्गाला जोडणाऱ्या सर्व्हिस रोडलगत असलेल्या शेतात मोरझरी, जुनापाणी (ता. हिंगणा) येथील काठियावाडी गुराख्यांचा डेरा मार्गस्थ होण्याच्या तयारीत होता. सर्व गुराखी हे गाई-गुरांसह रवाना झाले होते. तर महिला या छोट्या मुलांना घेऊन निघण्याच्या तयारीत होत्या. तेवढ्यात शॉर्टकटच्या नादात सर्व्हिस रोडच्या राँग साईडने आरोपीने भरधाव ट्रक आणला. भरधाव ट्रकचालकाला अचानक समोरून मोटरसायकलवर एक तरुण येत असल्याचे दिसताच त्याने मोटरसायकलस्वाराला वाचविण्यासाठी ट्रक बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक महिला-मुले असलेल्या शेतात गेला. तेथे वृद्ध महिलेसह तीन मुलींना धडक दिली.ट्रकचालकाला झाडाला बांधलेनागपूर : भीषण धडकेत गंभीर जखमी होऊन चौघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघाताबाबत समजताच काठियावाडी घटनास्थळी धावत आले आणि त्यांनी ट्रकचालकाला झाडाला बांधून ठेवले. तसेच त्याला मारहाण केली. त्यानंतर पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जमावाच्या तावडीतून आरोपीला सोडवून ताब्यात घेतले. या अपघातप्रकरणी आरोपी ट्रकचालकाविरुद्ध भादंविच्या कलम २७९, ३०४ (अ), १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संतोष ढेमरे करीत आहे. (प्रतिनिधी)