रेती माफिया आता प्रशासनाच्या रडारवर

By Admin | Updated: July 7, 2014 00:57 IST2014-07-07T00:57:32+5:302014-07-07T00:57:32+5:30

भरारी पथक गस्तीवर असताना वाहने झाडाझुडपांमध्ये किंवा दूरवर लपवून ठेवायची आणि पथक गेल्यावर रेतीची चोरटी वाहतूक करायची या रेतीमाफियांच्या वाहन लपवाछपवीवरही आता महसूल

The sand mafia is now on the radar of the administration | रेती माफिया आता प्रशासनाच्या रडारवर

रेती माफिया आता प्रशासनाच्या रडारवर

महसूल विभाग दक्ष : वाहन लपवाछपवीवरही लक्ष
नागपूर : भरारी पथक गस्तीवर असताना वाहने झाडाझुडपांमध्ये किंवा दूरवर लपवून ठेवायची आणि पथक गेल्यावर रेतीची चोरटी वाहतूक करायची या रेतीमाफियांच्या वाहन लपवाछपवीवरही आता महसूल खात्याचे लक्ष असणार आहे. तशा सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात सध्या रेतीचे अवैध उत्खनन हा कळीचा मुद्दा झाला आहे. महसूल खात्याच्या अपुऱ्या यंत्रणेचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात रेतीमाफियांकडून रेतीची चोरटी वाहतूक केली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी अलीकडेच एक बैठक घेऊन यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही उपाययोजना करण्याच्या सूचना खनिकर्म विभागाला दिल्या आहेत.
ज्या रेतीघाटावर अवैध उत्खनन अधिक होते, त्या घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर २४ तास लक्ष व गस्ती पथकाकडून निगराणी ठेवण्यास सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The sand mafia is now on the radar of the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.