समता सैनिक दलाचे अडीच हजार सैनिक देणार सेवा
By Admin | Updated: October 11, 2015 03:14 IST2015-10-11T03:14:15+5:302015-10-11T03:14:15+5:30
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेता सुरक्षा व्यवस्था ही सर्वात महत्त्वाची बाब आहे.

समता सैनिक दलाचे अडीच हजार सैनिक देणार सेवा
धम्मचक्र प्रवर्तन दिन: सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलिसांना करणार सहकार्य
नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेता सुरक्षा व्यवस्था ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सुरक्षा व्यवस्था सांभाळण्यासाठी पोलिसांना समता सैनिक दलाची मोठी मदत होईल. यंदा दलाचे अडीच हजार सैनिक दीक्षाभूमीवर सुरक्षा व्यवस्था सांभाळतील.
यासंदर्भात समता सैनिक दलाची विदर्भस्तरीय बैठक नंदनवन येथील समता बुद्धविहारात पार पडली. दीक्षाभूमी येथे २२ आॅक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा होणार आहे. त्यासाठी दोन दिवसापूर्वीपासूनच बौद्ध, आंबेडकरी अनुयायी येथे येतात. मुख्य सोहळ्याच्या दुसऱ्या दिवसापर्यंत लोकांची गर्दी असते. तेव्हा २१ ते २३ आॅक्टोबरदरम्यान दलाचे सुरक्षा व्यवस्था शिबिर दीक्षाभूमीवर आयोजित करण्यात येईल. भदंत नागदीपंकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर होईल. बोधानंद गुरुजी हे शिबिर प्रमुख राहतील. तर राष्ट्रीय अध्यक्ष डी.एफ. कोचे, महासचिव एम.आर. राऊत, प्रमिला सिद्धार्थ, जीओसी प्रदीप डोंगरे, श्रेयस सहारे, खुशाल लाडे, राजकुमार वंजारी, पृथ्वी मोटघरे, प्रा. गोवर्धन वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत २ हजार सैनिक गणवेशात सेवा देतील. तर ५०० सैनिक हे गर्दीत राहून अनुयायांना कुठलाही त्रास हेणार नाही, याची काळजी घेतील. तत्पूर्वी १४ आॅक्टोबर रोजी तथागत गौतम बुद्धांच्या पवित्र अस्थी नागपूरला येणार आहेत. त्यालाही सुरक्षा पुरविण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. बैठकीत भदंत नागदीपंकर, प्रदीप डोंगरे, राजकुमार वंजारी, बोधानंद गुरुजी, दुर्गेश थूल, पृथ्वी मोटघरे, प्रा. गोवर्धन वानखेडे, अॅड. राजू शेंडे, मुथीन मेश्राम, नरहरी मोटघरे, युवराज कांबळे, सुनील रंगारी, जनार्दन सुखदेवे, रमेश ढवळे, अनिल बावनगडे, चिंटू गजभिये, जयंता सहारे, प्रा. भावेश माटे, सुमित्रा सुखदेवे, हिरा मोटघरे, आदी सैनिक अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)