शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
4
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
7
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
8
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
9
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
10
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
11
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
12
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
13
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

तुटलेल्या रुळांवरून धावली संपर्कक्रांती एक्स्प्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 1:32 AM

बिहारमध्ये तुटलेल्या रुळांवरून धावलेल्या रेल्वेचा अपघात झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी सायंकाळी नागपुरातही सुदैवाने अशीच एक मोठी दुर्घटना टळली.

ठळक मुद्देरेल्वे कर्मचाºयाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली : तातडीने दुरुस्तीचे काम सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बिहारमध्ये तुटलेल्या रुळांवरून धावलेल्या रेल्वेचा अपघात झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी सायंकाळी नागपुरातही सुदैवाने अशीच एक मोठी दुर्घटना टळली. नागपूर रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून तुटलेल्या रुळांवरून संपर्कक्रांती एक्स्प्रेस रवाना झाली. या रेल्वेचे शेवटचे तीन डबे नेहमीपेक्षा जास्तच हालत असल्याचे प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या रेल्वे कर्मचाºयाच्या लक्षात आले. त्याला शंका आल्याने त्याने पुढे जाऊन पाहिले असता रूळ तुटला असल्याचे आढळून आले. त्याने त्वरित याची माहिती स्टेशन व संबंधित कर्मचाºयांना दिली. यानंतर लगेच दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. ही बाब कर्मचाºयाच्या त्वरित निदर्शनास आली नसती तर प्रसंगी या रुळावरून जाणाºया इतर रेल्वे गाड्यांचा मोठा अपघात होण्याची शक्यता होती.रेल्वेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी ५.४५ वाजता संपर्कक्रांती एक्स्प्रेस नागपूर स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून रवाना होत होती. प्लॅटफॉर्मच्या इटारसी दिशेच्या टोकाकडे उभे असलेले दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर मंडळाचे वरिष्ठ टीटीई जीतेंद्र कुमार हत्थेल यांनी पाहिले की, संपर्कक्रांती एक्स्प्रेसचे मागचे डबे नेहमीपेक्षा जास्तच हालत असून उसळी घेत आहेत. झटकेही खात आहेत. त्यांना संशय आला. त्यांनी जात असलेल्या रेल्वेचे बारकाईने निरीक्षण केले. रेल्वे जाताच हत्थेल यांनी रुळांची पाहणी केली असता त्यांना रूळ तुटला असल्याचे दिसून आले. हे पाहताच त्यांनी उपस्टेशन प्रबंधक (वाणिज्य) कार्यालयाकडे धाव घेतली. तेथे रूळ तुटल्याची माहिती दिली. उपस्टेशन प्रबंधक (वाणिज्य) राजू इंगले, प्रवीण रोकडे, अरुण श्रीवास्तव, आर.एस. तायडे यांनी लगेच हालचाली केल्या. काही वेळापूर्वीच अहमदाबाद एक्स्प्रेसला प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर येण्याचा सिग्नल देण्यात आला होता. इंगळे यांनी लगेच आऊटर डिप्टी एसएस आॅफिसला प्लॅटफॉर्म ब्लॉक करण्याची सूचना दिली. कंट्रोल रुमलाही कळवले. श्रीवास्तव, तायडे यांनी मध्य रेल्वे नागपूर मंडळ प्रशासनालाही याची माहिती दिली. याची दखल गेत रेल्वे स्टाफ त्वरित घटनास्थळी पोहचला व दुरुस्तीचे काम सुरू केले. तासभरात रुळाची दुरुस्ती करण्यात आली.अहमदाबाद एक्स्प्रेस आऊटरवर थांबविलीप्लॅटफॉर्म क्रमांक एकवरील रुळ तुटला असल्याची माहिती मिळताच आऊटर डिप्टी एसएस कार्यालयाने प्लॅटफॉर्म ब्लॉक केला. त्यामुळे अहमदाबाद एक्स्प्रेसला बराच वेळ आऊटरवर थांबविण्यात आले. नंतर प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर ही गाडी लावण्यात आली.अशा घटना होत असतात : गुप्ताया घटनेबाबत मध्य रेल्वे नागपूर मंडळाचे मंडळ रेल प्रबंधक बृजेश कुमार गुप्ता यांनी संपर्क केला असता ते म्हणाले, केवळ नागपूर मंडळातच नाही तर संपूर्ण भारतीय रेल्वेत फॅ्रक्चरच्या घटना होत असतात. रेल फॅ्रक्चर झाल्याची माहिती मिळताच त्वरित दुरुस्ती केली जाते.