शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्याला सलाम करत मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांकडून श्रद्धांजली अर्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 00:09 IST

देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. भारताच्या आर्थिक धोरणांचे शिल्पकार डॉ. सिंग यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे.

देशाने प्रशासक, अर्थतज्ज्ञ गमावलाभारताचे माजी पंतप्रधानडॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने एक उमदा प्रशासक, अर्थतज्ज्ञ गमावला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री, पंतप्रधान अशा विविध भूमिकांमधून त्यांनी काम केले आणि देशवासीयांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. भारताच्या राजकारणात स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अर्थशास्त्राशी संबंधित विपुल लेखनसुद्धा त्यांनी केले. त्यांनी केलेले कार्य कायम देशवासीयांच्या स्मरणात राहील. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री———————अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिलीमाजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाचे वृत्त ऐकून खूप दु:ख झाले. देशाचे अर्थमंत्री म्हणून अर्थव्यवस्थेला एक नवी दिशा देण्याचे काम त्यांनी केले. उच्चशिक्षित सोबतच विनम्र, शालीन व संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचे ते धनी होते. भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष असताना मला अनेकदा त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी मिळाली. ते नेहमी देशाला समोर नेण्याचाच विचार करायचे. हा देश डॉ. मनमोहन सिंग यांना कधीच विसरू शकणार नाही. - नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री———————अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणली - डॉ. मनमोहन सिंग हे एक मोठे अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी मांडलेले आर्थिक सिद्धांत व त्यांनी लावलेले आर्थिक शिस्त जगानेही स्वीकारली होती. पाश्चिमात्य देशामध्येही त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. आर्थिक मंदीच्या काळात त्यांनी देशाला सावरण्यात मोठे योगदान दिले. देशाची परकीय चलनाची गरज भागविण्यासाठी त्यांनी सोनं गहाण ठेवण्याचा निर्णय घेतला. यामुळे अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आली. इतिहास त्यांना सदैव स्मरणात ठेवेल. - प्रफुल्ल पटेल, माजी केंद्रीय मंत्री

———————

विद्वत्ता व विनम्रतेचा अनोखा संगमडॉ. मनमोहन सिंग हे अत्यंत नम्र, माणुसकी जपणारे आणि सभ्य स्वभावाचे व्यक्ती होते. ढोल वाजवण्यापेक्षा शांतपणे काम करण्यावर त्यांचा विश्वास होता. त्यांनी शत्रूंबाबतही कधीच कठोर शब्द वापरले नाहीत वा वैयक्तिक टीका केली नाही. त्यांना डमी पीएम, रिमोट कंट्रोल व रबर स्टॅम्प या नावाने हिणवले जात होते. परंतु, त्यांनी सर्व टीकेला आपल्या कार्यकौशल्याने उत्तर दिले. त्यांनी २००८ मध्ये भारत-अमेरिका आण्विक करारावरून जे व्हायचे ते होवो असे म्हणत ज्यांच्या पाठिंब्यावर सरकार बनले होते त्या डाव्या पक्षांना आव्हान दिले. परिणामी, डाव्यांनी साथ सोडली. त्यानंतरही त्यानंतरच्या निवडणुकीत दोनशेपेक्षा अधिक जागा जिंकून ते पुन्हा सत्तेवर आले. त्यांच्यासोबत राज्यसभेत काम करण्याची संधी हा माझ्यासाठी भाग्याचा विषय होता. भारतमातेच्या या थोर सुपुत्राला विनम्र श्रद्धांजली. —— डॉ. विजय दर्डा, चेअरमन, लोकमत एडिटोरियल बोर्ड तथा माजी राज्यसभा सदस्य (१९९८ ते २०१६)

———————

देशात आर्थिक क्रांती घडविलीमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे अर्थमंत्री म्हणून देशाप्रतीचे योगदान देश विसरू शकत नाही. त्यांनी केलेल्या आर्थिक सुधारणा या भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया होता. त्यांनी देशात आर्थिक क्रांती घडवली. १९९० च्या दशकात भारतीय अर्थव्यवस्थेला सावरण्यात त्यांचे मोठे योगदान होते. भारताचे भविष्य घडविणाऱ्या या नेत्याला भारतीय कधीच विसरणार नाहीत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. - विलास मुत्तेमवार, माजी केंद्रीय मंत्री ———————शांतीतून क्रांती घडविलीडॉ. मनमोहन सिंग हे देशाचे उत्कृष्ट पंतप्रधान तर होतेच पण जगात उत्कृष्ट अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांचे नाव होते. अभ्यासू व अतिशय प्रामाणिक व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख होती. शांत राहूनही क्रांती कशी घडविता येते हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. कधी कुणावर टीका टिप्पणी केली नाही. सदैव कामाला महत्त्व दिले. १९८५ ते  १९९० या काळात नियोजन आयोगाचे सदस्य म्हणून त्यांनी बजावलेली भूमिका दूरदर्शी अशीच होती.- विजय वडेट्टीवार, माजी विरोधी पक्षनेते———————-देशाचा कोहिनूर हिरा हरपला -माजी पंतप्रधान, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचं  निधन झाल्याची बातमी धक्कादायक आणि दुःखद आहे. देशाच्या आर्थिक उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. आज देशाचा कोहिनूर हिरा हरपला आहे. मनमोहन सिंग हे अर्थशास्त्रात उच्चशिक्षित होते. त्यांनी पंजाब विद्यापीठ, केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठसारख्या नामांकित विद्यापीठांमधून शिक्षण घेतले होते. १९९१ साली देश आर्थिक संकटाशी सामना करत असताना त्यावेळचे अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी देशाची बाजारपेठ जगासाठी खुली केली. त्यांनी खासगीकरण-उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा मार्ग अवलंबला आणि देशाची अर्थव्यवस्था ही रुळावर आणली. भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक असलेले मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर जगभर हळहळ व्यक्त केली जात आहे.- डॉ. नितीन राऊत, माजी मंत्री————————देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढले-जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ, देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढणारे आणि कमी बोलणारे पण काम प्रचंड करणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या दुःखद निधनाची वार्ता समजली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या निधनाने या देशाची अपरिमित हानी झाली आहे. त्यांची उणीव या देशाला कायम भासत राहील.- अनिल देशमुख, माजी गृहमंत्री

———————

भारतीय अर्थव्यवस्थेचे सरदारडॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाचे व काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. ते राजकारणात निपुण होते. परंतु कधीच राजकारण्यांसारखे वागत नव्हते. ते देश हित डोळ्यासमोर ठेवून निर्णय घ्यायचे. विविध विषयांत पारंगत असतानासुद्धा ते कोणताही निर्णय घेताना त्या त्या विषयातील तज्ज्ञांशी सल्लामसलत करायचे. ते खऱ्या अर्थाने भारतीय अर्थव्यवस्थेचे ‘’सरदार’’ होते. आज एक अत्यंत साधं पण उत्तुंग व्यक्तिमत्त्व देशाने व काँग्रेस पक्षाने गमावले आहे.- विकास ठाकरे,अध्यक्ष, नागपूर शहर काँग्रेस

———————

राजकारणातील आदर्शवत व्यक्तिमत्त्वडॉ. मनमोहन सिंग हे राजकारणातील एक आदर्शवत व्यक्तिमत्त्व होते. अत्यंत प्रामाणिक, अभ्यासू व उच्च विद्या विभूषित असतानाही त्यांच्या वागण्यात असलेला साधेपणा सर्वांचे मन जिंकून घेणारा होता. देशाला आर्थिक शिस्त लावून, अर्थ कारणाला वळण लावून देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढले. देशाला स्वयंपूर्ण बनवून सार्वजनिक उद्योग भरभराटीला आणले. एका मोठ्या अर्थतज्ज्ञाला देश मुकला आहे. - सुनीता गावंडे, माजी जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

टॅग्स :Manmohan Singhडॉ. मनमोहन सिंगDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसprime ministerपंतप्रधानcongressकाँग्रेस