दर्डा यांना पाहताच सलमानने मारली मिठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 23:11 IST2018-01-06T22:53:26+5:302018-01-06T23:11:48+5:30
विजय दर्डा समोर येताच सलमान यांनी त्यांना कडकडून मिठी मारली. भेट झाली, खूप खूप आनंद झाला, असे म्हणत सलमान यांनी स्मितहास्य केले. यावेळी ‘टायगर जिंदा है’ चित्रपटाच्या यशासाठी विजय दर्डा यांनी सलमानला शुभेच्छा दिल्या

दर्डा यांना पाहताच सलमानने मारली मिठी
आॅनलाईन लोकमत
नागपूर : सलमान खान जेव्हा नागपुरात आले तेव्हा ते विमानतळावरून कारमध्ये बसले. त्यांना इथे पहिल्यांदा आठवण झाली ती लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांची. आपल्यासोबत असलेल्या पीपी या मित्राला त्यांनी विजय दर्डा यांच्याबाबत विचारले, मला त्यांना फोन करायचा होता. कार्यक्रमस्थळी आल्याबरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘डोन्ट वरी, त्यांनाही इन्व्हाईट केलेय. ते येणार आहेत, असे सलमान यांना सांगितले. विजय दर्डा समोर येताच सलमान यांनी त्यांना कडकडून मिठी मारली. भेट झाली, खूप खूप आनंद झाला, असे म्हणत सलमान यांनी स्मितहास्य केले. यावेळी ‘टायगर जिंदा है’ चित्रपटाच्या यशासाठी विजय दर्डा यांनी सलमानला शुभेच्छा दिल्या. आता बॉलिवूडला हॉलिवूडकडे न्या. जागतिकस्तरावर आता सलमान खान यांची क्रेझ आहे. बॉलिवूडला हॉलिवूडकडे नेण्यासाठी आपले योगदान हवेय, अशी अपेक्षा विजय दर्डा यांनी यावेळी व्यक्त केली.