रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री मध्यस्थांच्याच माध्यमातून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:08 IST2021-04-20T04:08:21+5:302021-04-20T04:08:21+5:30
नागपूर : कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापरले जाणारे रेमडेसिविर हे इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्णांचे नातेवाईक अक्षरश: काकुळतीला येऊन विनंती करताना दिसत ...

रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री मध्यस्थांच्याच माध्यमातून
नागपूर : कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापरले जाणारे रेमडेसिविर हे इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्णांचे नातेवाईक अक्षरश: काकुळतीला येऊन विनंती करताना दिसत आहेत. काही दिवसापूर्वी काळाबाजार करून हे इंजेक्शन १५ ते २० हजार रुपयात विकले जायचे. मात्र पोलिसांच्या कारवाईनंतर आता काळाबाजार करणाऱ्यांनी पद्धतच बदलली आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना थेट औषध विक्री न करता मध्यस्थांच्या माध्यमातूनच दुकानदार विक्री करीत आहेत.
काळाबाजार करणाऱ्या टोळीतील सदस्यही आता परिचित आणि जवळच्या लोकांनाच हे औषध देत आहेत. एकदा सौदा ठरला की २० ते ३० हजार रुपये घेऊन ठरविलेल्या ठिकाणी बोलावत असतात. त्यानंतर खात्री पटल्यावर रक्कम घेऊन औषध देत असतात.
यासंदर्भातील ‘लोकमत’च्या चमूने काही फार्मा कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबत संपर्क साधला. त्यांच्या माध्यमातूनच रेमडेसिविर विकणाऱ्यांकडून खरेदी करण्याची तयारी दर्शविली. मात्र ठिकठिकाणी सुरू असलेल्या पोलीस कारवाईच्या भीतीने या टोळीतील सदस्यांनी अनोळखी व्यक्ती किंवा रुग्णांच्या नातेवाईकाला थेट इंजेक्शन विकण्यास नकार दिला. तर, अन्य पाहणीमध्ये नातेवाईकाने ५० हजार रुपये देण्याची तयारी दर्शविली तरी मध्यस्थांच्या माध्यमातूनच रक्कम घेऊन घेण्यास सुचविले. त्याला रात्री १२.३० वाजता एका ठिकाणी उभे ठेवले. त्यानंतर रात्री २ वाजता पारडी परिसरातील एकांतातील ठिकाणी एकट्याला बोलावून रेमडेसिविरचे एक इंजेक्शन दिले.
...
लगतच्या जिल्ह्यांमधून मागविले जातेय इंजेक्शन
मध्य नागपुरातील एका वकील महिलेचे पती २ एप्रिलपासून कोरोना रुग्णालयात भरती होते. त्यांना बाहेरून रेमडेसिविर इंजेक्शन आणण्यास सांगितले गेले. यानंतर त्यांनी फार्मा कंपनीमधील एका परिचिताच्या माध्यमातून भंडारा, अमरावती, रायपूर येथून १५ हजार रुपयात इंजेक्शन मागविले.
...