शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडचे विक्री अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2022 21:58 IST

Nagpur News प्रत्येकी एक लाख रुपयाची लाच मागितल्याच्या आरोपावरून केंद्रीय गुन्हे अण्वेषण विभागाने (सीबीआय) एकाच दिवशी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करून इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडचे (आयओसीएल)च्या तीन अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले.

ठळक मुद्देएकाच दिवशी दोन स्वतंत्र गुन्हेतीन आरोपी, प्रत्येकी एक लाखाची लाच नागपूर आणि गोंदियात कारवाई

नागपूर - प्रत्येकी एक लाख रुपयाची लाच मागितल्याच्या आरोपावरून केंद्रीय गुन्हे अण्वेषण विभागाने (सीबीआय) एकाच दिवशी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करून इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडचे (आयओसीएल)च्या तीन अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. नागपूर आणि गोंदियात सीबीआयने शुक्रवारी केलेल्या या कारवाईमुळे आयओसीएल वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

गोंदिया जिल्ह्यातील खाडीपार, गोरेगाव येथील मिरा पेट्रोल पंपाच्या मालकाला पंपावर आवश्यक साठा उपलब्ध करून देण्यासाठीदुसरीही अशीच एक आयओसीएलचे विक्री अधिकारी सुनील गोलार यांनी एक लाखाची लाच मागितली. पंप संचालकांनी सीबीआयचे वरिष्ठ अधीषक सलीम खान यांच्याकडे तक्रार नोंदवली. तक्रारीची शहानिशा सुरू असतानाच दुसरीही अशीच एक तक्रार आकाश अशोक चौधरी (गोरेगाव, गोंदिया) यांच्याकडून सीबीआयला मिळाली. या दोन्ही तक्रारी खऱ्या असल्याची खात्री करून घेतल्यानंतर अधीषक सलिम खान यांनी गुरुवारी रात्री या प्रकरणात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले. त्यानंतर दोन वेगवेगळी पथके तयार करून एका पथकाने गोंदियात गोलारविरुद्ध तर दुसऱ्या पथकाने नागपुरात कारवाई करून आयओसीएलचे महाव्यवस्थापक एन. पी. रोडगे आणि मुख्य व्यवस्थापक मनीष नंदले (किरकोळ विक्री) या दोघांना एक लाखाची लाच घेताना सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.

तिकडे गोंदिया, इकडे नागपूर

तिकडे गोंदियात गोलरच्या मुसक्या बांधल्यानंतर सीबीआयच्या पथकाने त्याच वेळी नंदले आणि रोडगेला नागपुरात जेरबंद केले. यानंतर या तिघांच्याही निवास आणि कार्यालयात सीबीआयच्या वेगवेगळ्या चमू झाडाझडती घेऊ लागल्या. रात्रीपर्यंत ही चौकशी सुरू होती. शनिवारी या तीनही लाचखोर अधिकाऱ्यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर केले जाईल, अशी माहीती अधीषल सलीम खान यांनी लोकमतला दिली. अशा प्रकारे लाचेसाठी कुणी काम अडवून धरत असेल आणि कोंडी करत असेल तर अशा लाचखोरांची तक्रार ०७१२-२५१०३८२ किंवा ९४२३६८३२११ या क्रमांकावर करावी, असे आवाहनही सीबीआयने केले आहे.

ए-वन, ए-टूचा होता कोड

आरोपी अधिकारी लाच घेताना सांकेतिक भाषेचा (कोडवर्ड) वापर करीत होते. रोडगे हे ए-वन नावाने तर नंदले ए -टू नावाने वावरत होते. लाच घेऊन गेलेल्या व्यक्तीला रोडगेने ती रक्कम ए टू कडे देण्यास सांगितले होते. त्यांच्यातील हा सर्व सांकेतिक व्यवहार सीबीआयने आधिच रेकॉर्ड केला होता. त्यामुळे त्यांना लाच स्विकारताना पकडताना पोलिसांना अडचण गेली नाही.

 

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभाग