शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
5
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
6
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
7
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
8
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
9
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
10
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
11
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
12
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
13
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
14
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
15
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
16
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
17
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
18
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
19
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
20
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य सुरक्षेच्या नावाखाली दर्जाहीन वस्तूंची विक्री; नियंत्रणाचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 12:22 IST

नागपूर शहरात अनेक ठिकाणी आयएसआय मार्क नसलेले आणि दर्जा नसलेले स्टीमर, मास्क तसेच सॅनिटायझरची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामुळे आरोग्याचा नवा प्रश्न होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देफूटपाथवर मिळतात स्टीमर आणि मास्क 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना संक्रमणाच्या भीतीमुळे सर्वसामान्य नागरिक स्वत:चे आरोग्य जपायला लागला आहे. याचा फायदा घेऊन आरोग्य सुरक्षेच्या नावाखाली दर्जाहीन वस्तूंची विक्री करण्याचा प्रकार शहरात वाढीस लागला आहे. शहरात अनेक ठिकाणी आयएसआय मार्क नसलेले आणि दर्जा नसलेले स्टीमर, मास्क तसेच सॅनिटायझरची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामुळे आरोग्याचा नवा प्रश्न होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

दररोज नियमितपणे वाफ घेतल्यामुळे कोरोना पळतो असा प्रचार सध्या सोशल मीडियामध्ये सुरू आहे. त्यामुळे अनेकांनी आता सहकुटुंब वाफारे घेणे सुरू केले आहे. यासाठी औषधांच्या दुकानांमध्ये चांगल्या दर्जाचे स्टीमर मिळतात. या स्टीमरचा दर्जा चांगला असल्यास व त्यासाठी वापरले गेलेले फायबर प्लास्टिक चांगल्या दर्जाचे असल्यास पाणी उकळल्यावर त्याचा परिणाम या प्लास्टिकवर होत नाही. परिणामत: श्वसनावरही त्याचा विपरीत परिणाम होत नाही. परंतु वाफारे घेण्याचे प्रमाण या काळात वाढल्यामुळे अर्थात स्टीमरची देखील मागणी वाढली आहे. ग्राहकांची ही मानसिकता लक्षात घेऊन अनेक कंपन्यांनी कसली गुणवत्ता न जोपासता बाजारात स्टीमर आणले आहेत. त्यात वापरले गेलेले प्लास्टिक कशा दर्जाचे आहे हे तपासण्याची गरज आहे. अगदी अडीचशे ते तीनशे रुपयेपर्यंत हे स्टीमर फूटपाथवर उपलब्ध होत असल्याने अनेकजण दर्जा न तपासता ते विकत घेतात, परंतु त्यासाठी वापरण्यात आलेले प्लास्टिक दर्जाहीन असल्यास त्याचा परिणाम आरोग्यावर होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने या बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे.स्टीमरसोबतच मास्क देखील मोठ्या प्रमाणात फूटपाथवर विक्रीला आहेत. कसलीही स्वच्छता न पाळता सहजपणे ते रस्त्यावर विकले जातात. या माध्यमातून नकळतपणे कोरोनाचे विषाणू पसरण्याचा धोका आहे. सॅनिटायझर स्प्रे देखील दर्जाहीन निर्मितीतून बनले गेले असल्याने ते लवकर निकामी होतात, अशा ग्राहकांच्या तक्रारी आहेत. आरोग्याच्या काळजीने पदरमोड करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची यातून फसवणूक होण्याची शक्यता अधिक आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्य