शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

एकाच जमिनीची अनेकांना विक्री : कोट्यवधींची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 11:19 PM

एकाच जमिनीची अनेकांना विक्री केल्याचे गुंतागुंतीचे प्रकरण हुडकेश्वर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आले असून, पोलिसांनी याप्रकरणी एका महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देगुंतागुंतीचे प्रकरण, अनेकांची झाली फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकाच जमिनीची अनेकांना विक्री केल्याचे गुंतागुंतीचे प्रकरण हुडकेश्वर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आले असून, पोलिसांनी याप्रकरणी एका महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे, ७ जून २०११ ते १५ मार्च २०१९ दरम्यानचे हे प्रकरण असून, त्यासंंबंधाने गुन्हा दाखल झाल्याची माहिती शनिवारी पोलिसांनी कळविली आहे.राजेश पुरुषोत्तम बोरकर (वय ५०, रा. वंदना अपार्टमेंट, गोपालनगर) आणि संजय सदुजी सोमकुवर (वय ४६, रा. सुरेंद्रनगर) या दोघांची जम्बुदीप बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स नावाने फर्म आहे. त्यांनी उर्मिला होमदेव जाधव (रा. श्री महालक्ष्मीनगर, नरसाळा), अशोक दत्तूजी मसराम (रा. आदिवासीनगर, दिघोरी) या दोघांकडून १६ नोव्हेंबर २०१० ला भास्कर चव्हाण, उमाबाई खंडाळे, किसन चव्हाण आणि पार्वताबाई गायकवाड यांच्या मुळ मालकीची मौजा चिखली खुर्द येथील २ हेक्टर ९७ आर शेतजमीन विकत घेण्याचा करार केला होता. या जमिनीचा विकास होणार नसल्यामुळे आरोपी जाधव आणि मसरामकडून शेतजमिनीवर डुप्लेक्स बांधून ते विकण्याचा करारनामा बोरकर आणि सोमकुंवर यांनी करून घेतला. मात्र, ही शेतजमीन डम्पिंग यार्डसाठी आरक्षित असल्याचे सुधार प्रन्यासकडून स्पष्ट करण्यात आल्याने, बोरकर आणि सोमकुंवरने ७० लाख रुपये प्रति एकर भावाने साडेतीन कोटी रुपयांत पाच एकर जमिनीचा सौदा करून रोख तसेच धनादेशाद्वारे ५० लाख रुपये आणि नंतर १ कोटी २२ लाख असे एकूण १ कोटी ७२ लाख रुपये आरोपी जाधव आणि मसरामला दिले. त्याबदल्यात आममुख्त्यारपत्र तयार करून घेण्यात आले. बोरकर आणि सोमकुंवर याशेतजमिनीवर नंतर ले-आऊट टाकण्यास गेले. त्यावेळी मूळ शेतमालकांपैकी किसन चव्हाण, पार्वताबाई गायकवाड यांनी ०.९८ हेक्टर जमीन २५ जुलै १९९३ ला विकल्याचे उघड झाले. परिणामी, बोरकर आणि सोमकुंवर यांनी उरलेल्या अडीच एकर शेतजमिनीपैकी सव्वाएकर जमीन मूळ मालक उमाबाई खंडाळे यांच्याकडून खरेदी केली. नंतर तेथे जम्बुदीप बिल्डरच्या नावाने ले-आऊट टाकून अरुणा भास्करराव रोकडे यांना ६ जून २०१६ ला तर नीलेश मेश्राम (लाखांदूर, भंडारा) यांना १५ जानेवारी २०१६ ला विकला.त्याची माहिती असूनही आरोपी जाधव आणि मसरामने बनावट सुभाष काळे आणि आशिष सरोदे या दोघांना १५ जानेवारी २०१९ ला तेथील भूखंडाची विक्री करून दिली. ते कळाल्यावर बोरकर आणि सोमकुंवरने आरोपी जाधव आणि मसरामला विचारणा केली असता त्यांनी हातपाय तोडण्याची धमकी दिल्याचे बोरकर यांनी तक्रारीत नमूद केले आहे.आरक्षित जमिनीची खरेदी विक्रीच संशयास्पद !विशेष म्हणजे, पोलिसांकडून देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार ही जमीन डम्पिंग यार्डसाठी आरक्षित असताना ती बिल्डर आणि डेव्हलपर्सने विकत घेतलीच कशी आणि आरक्षित जमिनीवर ले-आऊट टाकून लाखो रुपये घेऊन दुसऱ्यांना तेथील भूखंड विकलेच कसे, असा प्रश्न चर्चेला आला आहे. या संबंधाने पोलिसांकडून गोलमाल उत्तरे दिली जात असल्याने हे संपूर्ण प्रकरणच संशयास्पद बनले आहे. वरिष्ठांकडून या प्रकरणाची कसून चौकशी झाल्यास आणखी काही धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आरोपींची संख्याही वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी