शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

महावितरणच्या कर्मचाऱ्यांना वेळेवर मिळणार वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 21:31 IST

कर्मचारी भविष्य निधी खात्यात कंपनी व कर्मचारी हिस्सा वेळेत जमा करणे तसेच पदोन्नती, बदली, निलंबन किंवा नव्या रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन योग्य वेळेत करण्यासाठी महावितरणमध्ये नवीन व महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांमुळे महावितरणमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

ठळक मुद्देनवीन निर्णयांची अंमलबजावणी : पदोन्नती, बदली, पीएफ जमा करणे याकडेही लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कर्मचारी भविष्य निधी खात्यात कंपनी व कर्मचारी हिस्सा वेळेत जमा करणे तसेच पदोन्नती, बदली, निलंबन किंवा नव्या रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन योग्य वेळेत करण्यासाठी महावितरणमध्ये नवीन व महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांमुळे महावितरणमध्ये आनंदाचे वातावरण आहे.महावितरणने पदोन्नती किंवा बदलीने रुजू झालेल्या, कार्यमुक्त झालेल्या, निलंबित असलेल्या, नव्याने रुजू होणाºया, अपवादात्मक स्थितीत रजा अर्ज सादर न करता अनुपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले असून अशा प्रकारातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी योग्य वेळेत वेतन अदा करण्यासाठी परिपत्रकाद्वारे निर्देश जारी केले आहेत. या परिपत्रकानुसार महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी कंपनीच्या संचालक मंडळाशी सल्लामसलत करून कर्मचारी हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. त्यात प्रामुख्याने कंपनीत नव्याने रुजू होणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला महिन्याच्या १ ते १५ तारखेदरम्यान रुजू करून घेण्यात येऊन संबंधित कर्मचाऱ्याला त्वरित भविष्य निर्वाह निधी क्रमांक देऊन त्याला त्याच महिन्यात वेतन देण्यात यावे. कर्मचाऱ्यांचे मासिक पगार वेळेवर होण्यासाठी पदोन्नती अथवा बदली झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी कार्यमुक्त करण्यात यावे, या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची बदली होण्यापूर्वीच्या कार्यालयात त्याचा नियमित पगार अदा करण्यात येईल व नवीन कार्यालयात देखील कर्मचारी रुजू झाल्यावर त्याचा नियमित पगार वेळीच देणे शक्य होणार आहे. याशिवाय संबंधित कर्मचाऱ्याच्या कार्यमुक्तीच्या आदेशामध्ये त्याची वेतनश्रेणी, मूळ पगार, घरभाडे भत्ता याची पूर्ण माहिती दिल्या जाईल यामुळे नवीन कार्यालयात रुजू होतेवेळी ही सर्व माहिती संबंधित कर्मचाऱ्याच्या नवीन कार्यालयात सहजरीत्या उपलब्ध होईल.अपवादात्मक स्थितीत रजा अर्ज सादर न करता अनुपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनाही या परिपत्रकानुसार दिलासा देण्यात आला असून कंपनीच्या सेवेत असताना निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांना निलंबन कालावधी दरम्यान देय असलेल्या निलंबन भत्त्यातून त्याच्या भविष्य निर्वाह निधीचा हिस्सा वजा करून ती रक्कम भविष्य निर्वाह निधी आणि पेन्शन निधीत निर्धारित कालावधीत जमा करण्यात यावी, यासाठी संबंधित कर्मचाऱ्याला निलंबन भत्ता प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेपूर्वी अदा करण्याच्या सूचना सर्व संबंधित विभागांना या परिपत्रकातून देण्यात आल्या आहेत.महावितरणच्या या परिपत्रकामुळे कर्मचाऱ्यांना पगार वेळीच मिळण्यात मदत होणार असून भविष्य निर्वाह निधीचा भरणा वेळीच होऊन भविष्य निर्वाह निधीचा भरणा उशिराने झाल्याने भरावयास लागणारे व्याज आणि दंड टाळता येणार आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणEmployeeकर्मचारी