शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील १८ हजार शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 22:46 IST

जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिकविणाऱ्या १८ हजारपेक्षा अधिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविण्यात आले आहे. जिल्हा वेतन पथक अधीक्षक कार्यालयाने कोषागार विभागाच्या निर्देशानंतर ही कारवाई केली. या निर्णयामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला.

ठळक मुद्देकोषागार विभागाच्या निर्देशानंतर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिकविणाऱ्या १८ हजारपेक्षा अधिक शिक्षकशिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविण्यात आले आहे. जिल्हा वेतन पथक अधीक्षक कार्यालयाने कोषागार विभागाच्या निर्देशानंतर ही कारवाई केली. या निर्णयामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला.सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार नागपूर कोषागार विभागाने २८ जुलै २०२० रोजी नागपूर जिल्हा वेतन पथक अधीक्षक कार्यालयात याबाबत पत्र पाठविले. पत्रात दिलेल्या निर्देशानुसार वेतन थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. यावरून कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष असून कोषागार विभागाच्या मनमानी कारभारामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. शालेय शिक्षण विभागाकडून असा कुठलाही आदेश पारित केला नसल्याचे नमूद करण्यात आले. कोषागार विभागाच्या परिपत्रकात राज्य शासनाच्या ज्या निर्देशांचे कारण सांगितले आहे, ते चुकीचे आहे. राज्य शासनाने २९ डिसेंबर २०१९ रोजी एक परिपत्रक जारी केले होते, ज्यामध्ये विविध संवर्गात सरकारी सेवेत नियुक्त झालेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्र जमा करण्यास सांगण्यात आले होते. भाजपा शिक्षक आघाडीचे विदर्भ संयोजक अनिल शिवणकर म्हणाले, अनेक शिक्षक व कर्मचारी प्रमाणपत्र जमा करण्यास असफल ठरले, ज्यामुळे त्यांना अतिरिक्त ठरविण्यात आले. त्यांच्याबाबत काय निर्णय घ्यायचा, यावर विचार करण्यासाठी मंत्रिगटाची स्थापना करण्यात आली. यामध्ये विविध विभागांचे सचिव स्तराचे अधिकारी सहभागी होते. या समूहाचा अहवाल यायचा आहे. त्यापूर्वीच कोषागार विभागाने आदेश काढल्याची टीका संघटनेने केली.या मुद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तक्रार करण्याचा इशारा शिवणकर यांनी दिला. लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून अधिकाºयांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली जाईल. सोबतच जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी सुद्धा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विभागाच्या या निर्णयाने शिक्षक व कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकnagpurनागपूर