शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

फेक कॉलमुळे सक्करदरा पोलिसांची दमछाक, परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 23:55 IST

....पोलिसांसह साऱ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला.

नागपूर : मध्यप्रदेशातील काही व्यक्ती नागपुरात आल्या असून त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याचा कॉल पोलिसांना मिळाला. ही माहिती देणाऱ्या व्यक्तीने नंतर पोलिसांना प्रतिसाद देणे बंद केले. परिणामी पोलिसांची शुक्रवारी रात्री तब्बल दोन तास दमछाक झाली. संबंधित व्यक्तीचा शोध घेतल्यानंतर काहीही संशयास्पद नसल्याचे आणि फोन करणाऱ्याने व्यक्तिगत कारणामुळे खोडसाळपणा केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांसह साऱ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला.

सक्करदराचे ठाणेदार सत्यवान माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास पोलीस ठाण्यातील एका हवालदाराच्या मोबाईलवर एकाने फोन केला. जुना सक्करदरा भागात काही व्यक्ती मध्यप्रदेशातून आल्या आहेत. त्यांच्या हालचाली एकूणच संशयास्पद असल्याचे या व्यक्तीने फोनवर सांगितले. हवालदार यांनी ही माहिती ठाणेदारांना दिली. त्यानंतर सक्करदरा पोलीस ठाण्यातील पथक फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊ लागले. त्याने नेमका पत्ता न दिल्यामुळे कोणत्या व्यक्ती कुठे आल्या, ते कळायला मार्ग नव्हता. त्यामुळे पोलिसांनी बरीच धावपळ करून फोन करणाऱ्या व्यक्तीला आधी शोधून काढले. त्यानंतर त्याने ज्या व्यक्तींबद्दल माहिती दिली होती, त्या व्यक्तीचे घर गाठले. नंतर ज्यांच्या बाबतीत माहिती होती. त्या कुटुंबातील व्यक्तींना आणि आजूबाजूच्यांना विचारणा करण्यात आली.

दरम्यानच्या चौकशीत फोन करणाऱ्या व्यक्तीने आपसी वैमनस्यामुळे संबंधित कुटुंबातील व्यक्तींना मनस्ताप देण्यासाठी हा खोडसाळपणा केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांची मात्र दोन तास दमछाक झाली आणि परिसरातही खळबळ निर्माण झाली होती. पोलिसांनी दिशाभूल करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेऊन समज देऊन नंतर त्याला सोडून दिले.

खोडसाळपणा करणाऱ्या व्यक्तीने फोनवर काहीही स्पष्ट सांगितले नव्हते. त्यामुळे पोलीसही संभ्रमात होते. सध्या कोरोनाचा धोका लक्षात घेऊन, तसेच काही असावे, असा अंदाज बांधून पोलिसांनी मेडिकलमध्ये सूचना देऊन आरोग्य पथकही मागवले होते. मात्र, त्याचे कामच पडले नाही.

टॅग्स :nagpurनागपूरPoliceपोलिस