सक्करदरा तलाव नासतोय, प्रशासनाने दखल घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:09 IST2021-02-09T04:09:05+5:302021-02-09T04:09:05+5:30

- युवा चेतना मंचचे सभापतींना निवेदन नागपूर : सक्करदार तलावात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्याच्या बाजूला ...

Sakkarada lake is running out, the administration should take notice | सक्करदरा तलाव नासतोय, प्रशासनाने दखल घ्यावी

सक्करदरा तलाव नासतोय, प्रशासनाने दखल घ्यावी

- युवा चेतना मंचचे सभापतींना निवेदन

नागपूर : सक्करदार तलावात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्याच्या बाजूला असलेली सुरक्षा भिंत जीर्ण झाली असून, मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची भीती आहे. तेव्हा याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, या मागणीचे निवेदन युवा चेतना मंचने नेहरूनगर झोन सभापती समिता चकोले यांना दिले.

बऱ्याच वर्षांपासून तलावाचे सौंदर्यीकरण झालेले नाही. हा तलाव दक्षिण नागपूरची शान आहे. उद्यानाची काही जागा भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे. परंतु, संबंधिताने संपूर्ण उद्यानावर अतिक्रमण केले आहे. याकडे नागपूर महानगरपालिकेचे दुर्लक्ष असून, तातडीने कारवाई करण्याची मागणी मंचाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष महेश महाडिक यांच्या नेतृत्वात प्रवीण घरजाळे, शेखर कुकडे, राहुल बांबल, दत्ता शिर्के यांनी केली आहे.

..

Web Title: Sakkarada lake is running out, the administration should take notice