शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
3
धोक्याची घंटा! इंफेक्शनमुळे ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू; काय आहे Flesh-Eating Bacteria?
4
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
5
जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’
6
लाईफ इन्शुरन्स धारकांसाठी खूशखबर! पॉलिसी मध्येच सरेंडर केल्यास मिळणार पूर्वीपेक्षा अधिक पैसे
7
बुडणार नाही तास, शाळेतच मिळणार पास; ‘एसटी’चे एक पाऊल पुढे
8
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
9
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
10
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
11
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
12
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
13
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
14
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
15
Munjya Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
16
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
17
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
18
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
19
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
20
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू

सकल मराठा समाजाचा ठोक मोर्चा शांततेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 1:23 AM

आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाचा ९ आॅगस्टचा ठोक मोर्चा शांततेत निघणार आहे. मोर्चाच्या यशस्वीतेसाठी आणि कुठलीही अनुचित घटना घडू नये, याकरिता व्यापारी संघटना आणि लोकांनी मोर्चाला सहकार्य करावे तसेच व्यापाऱ्यांनी दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवावीत, असे आवाहन राजे मुधोजी भोसले यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत केले.

ठळक मुद्दे९ आॅगस्ट : सर्वांना मदतीचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाचा ९ आॅगस्टचा ठोक मोर्चा शांततेत निघणार आहे. मोर्चाच्या यशस्वीतेसाठी आणि कुठलीही अनुचित घटना घडू नये, याकरिता व्यापारी संघटना आणि लोकांनी मोर्चाला सहकार्य करावे तसेच व्यापाऱ्यांनी दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवावीत, असे आवाहन राजे मुधोजी भोसले यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत केले.९ आॅगस्टला सकाळी ९ वाजता समाजबांधव व महिला महाल, गांधीगेट येथील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ गोळा होणार आहे. १० वाजता महाआरती आणि त्यानंतर आंदोलनाला सुरुवात होईल. मोर्चाला गालबोट लागू नये म्हणून समाजाने जिल्हाधिकारी, पोलीस विभाग, शिक्षण विभाग, एसटी महामंडळ, व्यापारी संघटनांना निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे. समाजबांधव प्रशासन आणि पोलिसांना सहकार्य करणार आहे. यादिवशी जवळपास २५ हजार समाजबांधव आणि महिला रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे. चौकाचौकात जाऊन युवक शासनाविरोधात निदर्शने करतील. बसेस आमची संपत्ती असून कुठलीही अनुचित घटना होणार नाही तसेच आरक्षणाच्या मागणीसाठी दुसºयाला त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यात येणार आहे. व्यापाºयांनी दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवावीत, असे आवाहन त्यांना करण्यात आले आहे. ९ आॅगस्टनंतर शासनाची भूमिका सकारात्मक न राहिल्यास आंदोलन उग्र होईल, असे भोसले यांनी सांगितले.आंदोलनात सकल मराठा समाज कुटुंबीयांसह उतरणार आहे. नागपुरात समाजाची जवळपास ५० हजार घरे आहेत. मराठा समाज नेहमीच लोकांसाठी लढला आहे. आता तो पैसा आणि शिक्षणापासून वंचित आहे. आर्थिक निकषावर आरक्षण मिळून मुलांनी उच्चशिक्षण घेऊन देशसेवा करावी, अशी इच्छा आहे. कुणाचेही आरक्षण हिरावून आम्हाला आरक्षण नको आहे. १६ टक्के आरक्षणाची मागणी आहे. आंदोलनाला भावसार, हलबा युवा समाज, मुस्लीम परिषदेसह अनेक समाजाचा पाठिंबा मिळाला आहे. या दिवशी शहरात तीन मोठे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमाला समाजाने पाठिंबा दिल्याचे भोसले यांनी सांगितले.पत्रपरिषदेत प्रशांत मोहिते, शिरीष राजे शिर्के, देविदास किरपाने, नरेंद्र मोहिते, प्रशांत भोसले, राजे जयसिंग भोसले, विनय बाबर, शीतल सुरसे, हेमंत भोसले, छोटू पवार, लक्ष्मीकांत किरपाने, छोटू शिंदे, रोहिणी भोसले, पल्लवी जाधव, मेघा शिंदे, सोनिया साबळे, स्वाती चव्हाण, दत्तूजी जगताप, विजय भोसले, बाळासाहेब गायकवाड उपस्थित होते.पोलिसांची मॉक ड्रील ९ आॅगस्टला महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर उपराजधानीतील कायदा आणि सुव्यवस्थेची चाचपणी करण्यासाठी शहर पोलिसांनी मंगळवारी विविध भागात मॉक ड्रील(रिहर्सल)केली.मराठा आरक्षणाच्या संबंधाने मराठा समाजाने ९ आॅगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यामुळे राज्य पोलीस दलाने आवश्यक त्या उपाययोजना सुरू केल्या असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर, शहर पोलिसांनी आज शहरात विविध भागात सुरक्षेची चाचपणी केली. पुढच्या आठवड्यात स्वातंत्र्यदिन आहे. त्यामुळे देशभर अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :marathaमराठाMorchaमोर्चा