संत गजानन महाराज समाधीदिन

By Admin | Updated: September 19, 2015 04:03 IST2015-09-19T04:03:20+5:302015-09-19T04:03:20+5:30

श्री संत गजानन महाराज यांच्या समाधी दिन सोहळ्यानिमित्त शहरातील गजानन महाराज मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Saint Gajanan Maharaj Samadhi Din | संत गजानन महाराज समाधीदिन

संत गजानन महाराज समाधीदिन

सोहळा उत्साहात साजरा
नागपूर : श्री संत गजानन महाराज यांच्या समाधी दिन सोहळ्यानिमित्त शहरातील गजानन महाराज मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी अभिषेक, विजयग्रंथाचे पारायण, आरती झाल्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. दर्शनासाठी सर्वच मंदिरात मोठ्या संख्येने गर्दी केली होती. (प्रतिनिधी)

श्री संत गजानन महाराज श्रद्धास्थान, रेशीमबाग
श्रद्धास्थानात महाराजांच्या समाधी दिन सोहळ्याला सकाळपासून सुरुवात झाली. महाराजांचा अभिषेक, मंगलआरती करण्यात आली. याप्रसंगी टी-सिरीजतर्फे गजानन महाराजांचे निसिम्म भक्त व प्रचारक संतकवी कमलासूत चंद्रशेखर वराडपांडे यांच्या स्मृतीला अर्पित ‘श्री गजानन मानसपूजा’ व्हीसीडीचे विमोचन दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्रकाश एदलाबादकर, श्रद्धास्थानाचे संयोजक गिरीश वराडपांडे, रघुनाथ बोबडे, प्रशांत कामडे, ईश्वर धिरडे उपस्थित होते. यानंतर सायंकाळी गजानन गीतांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात डॉ. श्रीरंग वराडपांडे, प्रांजली देव, धनंजय टोपरे, प्रमोद व्यवहारे, अशोक भेंडे, नरेश इटनकर, नरेंद्र गोरले आदींनी सहकार्य केले.
गजानन महाराज मंदिर, झेंडा चौक, धरमपेठ
धरमपेठ झेंडा चौकातील महाराजांच्या समाधी दिनानिमित्त सकाळी अभिषेक करण्यात आला. दिवसभर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी परिसरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. रक्मिणीदेवी कापरे यांनी मंदिराची स्थापना केली होती. समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन अरुण चोरघडे, सुफला देशमुख, ज्योती कापरे, रोहिणी कापरे, कल्पना पाठक, मंगला भालेराव, शोभा भिमगडे, आशा अग्रवाल, वर्षा वारजूरकर, यमुताई गेडाम.
योगीराज गजानन सेवा प्रतिष्ठान, अंबाझरी
समाधी दिन सोहळ्यानिमित्त महाराजांचा महाअभिषेक करण्यात आला. महाप्रसाद व भजनांच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त भक्तगणांनी महाराजांच्या जीवनचरित्रावरील आठवणींचे स्मरण केले. अध्यक्ष अशोक नारखेडे, सचिव माधवराव आकोलकर, उपाध्यक्ष मधुकर आंबेकर, कोषाध्यक्ष बाळकृष्ण माहुरे, सहसचिव दत्तू चौधरी, विश्वस्त अंबादास शेटे, प्रा. शेखर भोले, उषा नारखेडे, विनय नारखेडे यांनी कार्यक्रमाची व्यवस्था सांभाळली.

Web Title: Saint Gajanan Maharaj Samadhi Din

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.