साईबाबाचा जगण्याचा अधिकार हिरावला जात आहे

By Admin | Updated: July 9, 2014 01:01 IST2014-07-09T01:01:26+5:302014-07-09T01:01:26+5:30

नक्षल चळवळीचा मास्टरमार्इंड असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले प्रो. जी.एन. साईबाबा नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आहे. ते पोलिओग्रस्त असल्याने त्यांना व्हीलचेअर, शौचासाठी कमोडची

Saibaba is being denied the right to live | साईबाबाचा जगण्याचा अधिकार हिरावला जात आहे

साईबाबाचा जगण्याचा अधिकार हिरावला जात आहे

कोळसेपाटील : जामीन देण्याची मागणी
नागपूर : नक्षल चळवळीचा मास्टरमार्इंड असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले प्रो. जी.एन. साईबाबा नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आहे. ते पोलिओग्रस्त असल्याने त्यांना व्हीलचेअर, शौचासाठी कमोडची आवश्यकता आहे. मात्र नागपूरच्या कारागृहात अपंग कैद्यांकरिता व्यवस्था नसल्याने, त्यांचा जगण्याचा अधिकार हिरावल्या जात आहे. माणूस म्हणून जगण्याची सोय उपलब्ध करून द्यावी, अन्यथा त्याला जामीन द्यावा, अशी मागणी माजी न्यायमूर्ती कोळसेपाटील यांनी पत्रपरिषदेत केली.
दिल्ली विद्यापीठाने साईबाबाच्या सुटकेसाठी डिफेन्स कमिटीची स्थापना केली आहे. ही कमिटी साईबाबाच्या भेटीसाठी आज कारागृहात आली होती. या कमिटीसोबत कोळसेपाटीलसुद्धा आले होते. कारागृहात साईबाबाची व्यवस्था नीट होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. साईबाबाला दोन महिन्यापूर्वी नागपूरच्या कारागृहात आणण्यात आले.
१४ दिवसांत त्याला कोर्टापुढे सादर करणे गरजेचे होते. मात्र कारागृहाजवळ व्हीलचेअर नसल्याने, पोलीस त्याला दोन महिन्यापासून कोर्टापुढे सादर करू शकले नाही. पोलिसांनी साईबाबाविरुद्ध चार्जशीट फाईल केली आहे. त्यामुळे त्याला बेलवर सोडण्यास काही हरकत नसल्याचे कोळसेपाटील म्हणाले. यावेळी साईबाबाची पत्नी वसंता उपस्थित होती. पोलिसांनी साईबाबाला कुठल्याही सर्च वॉरंटशिवाय अटक केली. त्यांचे अपहरण केल्याचा आरोप वसंता यांनी केला. साईबाबाला सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यास कारागृह असमर्थ असल्याने त्यांची प्रकृती खालावत असल्याचे त्या म्हणाल्या. पत्रपरिषदेला उपस्थित असलेले डिफेन्स कमिटीचे सदस्य वरावरा राव म्हणाले की, साईबाबाचे नक्षल चळवळीशी कुठलेही संबंध नाही. त्याने आपल्या साहित्यातून आदिवासींवर होणारे अत्याचार, त्यांच्या व्यथा मांडल्या आहेत. त्याचबरोबर सरकार संविधानानुसार कर्तव्य बजावत नसल्याची टीका त्यांनी साहित्यातून केली आहे.
मात्र सरकारने त्याचा विपर्यास करून साहित्यातून मांडलेल्या विचारांना नक्षल चळवळीशी जोडले असल्याचा आरोप त्यांनी केला. (प्रतिनिधी)

Web Title: Saibaba is being denied the right to live

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.