शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

तर, भंडारा बेचिराख झाले असते...; अडीच टन आरडीएक्स बाहेर काढण्याचे काम सुरु

By नरेश डोंगरे | Updated: January 26, 2025 15:22 IST

भंडाऱ्यात झालेल्या भीषण स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला असून पाच जणांची मृत्यूशी झुंज सुरू आहे.

नरेश डोंगरे

नागपूर : सुरक्षेच्या संपूर्ण मार्गदर्शक तत्त्वांची योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्यात आल्यामुळे एवढा मोठा भीषण स्फोट होऊनही ऑडनस फॅक्टरीच्या परिसराबाहेर त्याची धग पोहोचली नाही. सुरक्षेच्या उपाययोजना झाल्या नसत्या तर या स्फोटाची तीव्रता अधिक भयानक झाली असती आणि अख्खा भंडारा बेचिराक झाला असता, अशी माहिती वजा प्रतिक्रिया संबंधित सूत्रांनी लोकमतला दिली 

भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीच्या लो टेंपरेचर प्लास्टिक एक्सप्लोसिव्ह बिल्डिंग नंबर २३ मध्ये शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास भीषण स्फोट होऊन आठ जणांचा मृत्यू झाला तर पाच जणांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. या स्फोटामुळे अत्यंत मजबुतीने बांधण्यात आलेली एलटीपिईची इमारत अक्षरशः जमीनदोस्त झाली. विशेष म्हणजे, या इमारतीत अडीच टनापेक्षा जास्त आरडीएक्स होते. ते या बिल्डिंगच्या मलब्यात दबले गेले. गेल्या २४ तासांपासून हे आरडीएक्स सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे काम फॉरेनसिक टीम करीत आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर आरडीएक्स सारखे शक्तिशाली स्फोटक ज्या ठिकाणी होते, त्या ठिकाणी हा भयंकर स्फोट झाला. यातील पाच ते दहा टक्के आरडीएक्स स्फोटाच्या कचाट्यात आले असते, तर एक भयंकर स्फोट होऊन अख्खे भंडारा बेचिराख झाले असते. मात्र ज्या ठिकाणी हे आरडीएक्स ठेवले गेले होते, ते विशिष्ट आवरणात अत्यंत सुरक्षितरित्या ठेवून होते. 

सूत्रांच्या माहितीनुसार, आरडीएक्सचा स्फोट घडविण्यासाठी  डीटोनेटर कनेक्ट करणे आवश्यक असते. उदाहरणार्थ ज्याप्रमाणे शोभेच्या दारूगोळ्यात किंवा फटाका फोडताना आधी फटाक्याची पुंगळी केली जाते किंवा गोळा केला जातो त्यात वात लावली जाते आणि या वातीला आग लावल्यानंतर त्याचा स्फोट होतो त्याप्रमाणेच आरडीएक्सला डीटोनेटरचे कनेक्शन करून स्पोट घडवून आणला जाऊ शकतो. सुदैवाने हे कनेक्शन तेथे नव्हते. उच्च दर्जाचे एवढ्या मोठ्या प्रमाणात आरडीएक्स तेथे होते मात्र त्याचा स्फोट होणार नाही, या संबंधाने सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करून ठेवण्यात आल्या होत्या. त्याचमुळे शुक्रवारी भयंकर स्फोट होऊनही डीटोटोनेटर्स बिल्डिंगच्या मलब्यात गाडले गेले. 

हे आरडीएक्स सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यासाठी डिफेन्स आणि फॉरेन्सिक तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या २४ तासापासून काम सुरू आहे. शीर्षस्थ सूत्रानुसार, ते बाहेर काढण्यासाठी विशिष्ट रसायन मिश्रित पाण्याचा मारा करण्यात येतो आणि त्यानंतर हे आरडीएक्स बाहेर काढले जाते.

भंडारा येथील पोलीस अधीक्षक नुरल हसन यांच्याशी यासंबंधने संपर्क केला असता त्यांनी "आम्ही बंदोबस्ताकरिता आवश्यक ते मनुष्यबळ तिथे नेमले असून बाकी सर्व काम संरक्षण खात्याचे तज्ञ करीत आहेत, याबद्दल मला काही सांगता येणार नाही" अशी माहिती त्यांनी लोकमतला दिली.

टॅग्स :Bhandara Fireभंडारा आगnagpurनागपूर