विधान मंडळाला सुरक्षा कवच

By Admin | Updated: November 28, 2015 03:34 IST2015-11-28T03:34:32+5:302015-11-28T03:34:32+5:30

७ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाची तयारी जोरात सुरू आहे. दरम्यान शुक्रवारी मुंबईतील विधिमंडळ सुरक्षा अधिकाऱ्यांनी नागपुरातील..

Safety armor in the Legislative Assembly | विधान मंडळाला सुरक्षा कवच

विधान मंडळाला सुरक्षा कवच

चार ट्रक साहित्य दाखल : सचिवालय सोमवारपासून सुरू होणार
ंनागपूर : ७ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाची तयारी जोरात सुरू आहे. दरम्यान शुक्रवारी मुंबईतील विधिमंडळ सुरक्षा अधिकाऱ्यांनी नागपुरातील विधान भवनाची सुरक्षा आपल्या ताब्यात घेतली आहे. तसेच मुंबईहून सचिवालयातील फाईल्ससह एकूणच महत्त्वाचे दस्तऐवज घेऊन चार ट्रक नागपुरात दाखल झाले आहेत. दस्तऐवजांच्या पेट्या संबंधित विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांना वितरित करण्यात आल्या आहेत.
विधिमंडळाच्या सुरक्षा अधिकारी (सार्जंट) यांनी शुक्रवारपासून विधान भवनातील सुरक्षा आपल्या ताब्यात घेतली आहे. विधानभवनातील मुख्य गेटवर प्रत्येकाची कसून चौकशी केली जात आहे. ओळख पत्र दाखविल्यावरच प्रवेश दिला जात आहे. यासोबतच विधान भवनातील तयारी सुरूआहे. सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांच्या कक्षाच्या रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात आहे. यासोबतच प्रवेश पासेस उपलब्ध करून देण्याचे कामही सुरू झाले आहे. मुंबईहून जवळपास ३५० च्या जवळपास कर्मचारी नागपुरात दाखल झाले आहेत. दस्तऐवज, फाईल्स, पुस्तके, कॉम्प्युटर आदी लावण्याचे काम सुरू झाले आहे. शनिवार आणि रविवार सुटी आहे. त्यामुळे दोन दिवस संपूर्ण साहित्य लावण्याचे काम केले जाईल. त्यामुळे सोमवारपासून सचिवालयाच्या कामकाजास सुरुवात होण्याची शक्यता आहे.

Web Title: Safety armor in the Legislative Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.