रस्त्यावर मजुरांचा बळी हे सरकारचे अघाेरी पाप ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:07 IST2020-12-26T04:07:20+5:302020-12-26T04:07:20+5:30
नागपूर : काेणतीही पूर्वसंधी न देता अचानक लागलेल्या टाळेबंदीने हाहाकार माजला. ज्यांच्याकडे व्यवस्था हाेती ते तगले पण बेहाल झाले ...

रस्त्यावर मजुरांचा बळी हे सरकारचे अघाेरी पाप ()
नागपूर : काेणतीही पूर्वसंधी न देता अचानक लागलेल्या टाळेबंदीने हाहाकार माजला. ज्यांच्याकडे व्यवस्था हाेती ते तगले पण बेहाल झाले ते हातावर पाेट असलेल्या मजुरांचे, निराधारांचे. वेगवेगळ्या राज्यात राहणाऱ्या लाखाे मजूर एका क्षणात रस्त्यावर आले आणि सुरू झाली शेकडाे किलाेमीटरची पायपीट. कित्येकांच्या पायाची चाळण झाली, कुणी जायबंदी झाले तर शेकडाेंचे बळी गेले. काेणतेही नियाेजन न करता टाळेबंदी करणारे निर्दयी सरकार या साऱ्यांच्या वेदनांसाठी जबाबदार आहे. मजुरांच्या या यातना सरकारचे अघाेरी पाप आहे आणि राज्य सरकारही त्यात भागीदार आहे, अशी घणाघाती टीका ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. वासुदेव डहाके यांनी केली.
संघर्ष वाहिनीचे सामाजिक कार्यकर्ता दीनानाथ वाघमारे यांनी संपादित केलेल्या 'लाॅकडाऊन : स्थलांतरित मजूर व भटक्या जमाती' या पुस्तकाच्या विमाेचन प्रसंगी ते बाेलत हाेते. नाताळच्या पर्वावर शुक्रवारी या पुस्तकाचे लाेकार्पण करण्यात आले. यावेळी दीनबंधू सेवा संस्थेचे नितीन सरदार, ज्ञानेश्वर रक्षक, भटक्या विमुक्त चळवळीतील कार्यकर्ते खिमेश बढिये, बेलदार समाज संघर्ष समितीचे प्रदेश अध्यक्ष राजेंद्र बढिये, डाॅ. गुहा, मुकुंद अडेवार, धीरज भिसीकर, भाग्यश्री ठाकरे आदी उपस्थित हाेते. अभिजित परागे यांनी पुस्तकामागची भूमिका मांडली. लाॅकडाऊनच्या काळात पायपीट करणाऱ्या स्थलांतरित मजुरांच्या मदतीसाठी शेकडाे हात पुढे आले. हे मदतकार्य करताना आलेले अनुभव, स्थलांतरितांच्या व्यथा, वेदना या पुस्तकात मांडल्या आहेत. यासाेबत शेकडाे वर्षापासून भटकंती करणाऱ्या भटक्या विमुक्त समाजाच्या सत्य परिस्थितीचे विश्लेषण यामध्ये असल्याचे परागे यांनी सांगितले.