शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

सचिन शिरबाविकरने पूर्ण केली १,५२८ किलोमीटरची सायकल रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2020 10:57 PM

देशातील टाळेबंदीच्या काळात नागपूरचे सचिन शिरबाविकर यांनी डॉ. अमित समर्थ यांच्या मार्गदर्शनात १,५२८ किलोमीटर ‘रेस अक्रॉस वेस्ट’ सायकल स्पर्धेत दिमाखदार यश प्राप्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील टाळेबंदीच्या काळात नागपूरचे सचिन शिरबाविकर यांनी डॉ. अमित समर्थ यांच्या मार्गदर्शनात १,५२८ किलोमीटर ‘रेस अक्रॉस वेस्ट’ सायकल स्पर्धेत दिमाखदार यश प्राप्त केले.प्रो हेल्थ फाऊंडेशन व माईल्स अ‍ॅण्ड मायलर्स एन्डूरन्स स्पोटर्स अकादमीच्या सहयोगाने नागपूरच्या इंडिया पॅडल्स संस्थेच्या प्रोत्साहनाने शिरबाविकर यांनी सहभाग घेतला. सुमारे ८० हजार फूट एलिव्हेशन गाठत त्यांनी ही स्पर्धा सात दिवस तीन तासात पूर्ण केली.प्रत्यक्षात ही स्पर्धा १२ दिवसात पूर्ण करायची होती, पण सचिन यांनी सात दिवसातच ध्येय गाठले. व्हर्च्युअल पद्धतीने झालेल्या या सायकल शर्यतीत सचिन यांच्याव्यतिरिक्त जगभरातील ८३ सायकलपटंनी भाग घेतला होता. ६ जून ते २८ जून दरम्यान ही शर्यत झाली असली तरी सचिन शिरबाविकर यांनी ही स्पर्धा ५ दिवस आधीच पूर्ण केली.मधुमेहाचे रुग्ण असलेल्या सचिन यांनी या स्पर्धेसाठी आपले वजन २० किलोग्रॅमने घटविले. साखरेची पातळी नियंत्रणात ठेवली. मागील तीन वर्षात अनेक हाफ मॅरेथॉन, आयरन मॅन स्पर्धांत भाग घेऊन पूर्ण केल्या. नागपूर -पचमढी व मनाली-लेह तसेच मुंबई-गोवा या दरम्यानच्या सायकल अभियानातदेखील यशस्वी भाग घेतला.भारतातून सहा सायकलपटूंनी ही स्पर्धा पूर्ण केली. कुटुंबातील सर्वांचे विशेषत: आई ज्योती, पत्नी अमिता आणि मुलगा श्रीधर यांचे सहकार्य मिळाल्याचे ते सांगतात. डॉ. राजश्री व डॉ. शंतनू सेनगुप्ता, डॉ. अभिनव कन्हेर यांच्या चमूने त्यांच्या वैद्यकीय तपासणीची जबाबदारी सांभाळली. ते आपल्या यशाचे श्रेय वैभव व गायत्री अंधारे, भूषण वासवानी, ज्योती पटेल, ऋषी सेहगल, आशिष उंबरकर यांना देतात.

टॅग्स :Cyclingसायकलिंगnagpurनागपूर