उपवासासाठी साबुदाणा, नको रे बाप्पा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:11 IST2021-08-12T04:11:47+5:302021-08-12T04:11:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : खास उपवास म्हटला की साबुदाणा आणि साबुदाण्याचे वेगवेगळे चविष्ट पदार्थ आलेच. म्हटले तर उपवास ...

Sabudana for fasting, no, Bappa! | उपवासासाठी साबुदाणा, नको रे बाप्पा!

उपवासासाठी साबुदाणा, नको रे बाप्पा!

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : खास उपवास म्हटला की साबुदाणा आणि साबुदाण्याचे वेगवेगळे चविष्ट पदार्थ आलेच. म्हटले तर उपवास व साबुदाणा एकमेकांना पर्यायच झाले आहेत. सोबतच भगर आणि अन्य उपवासाचे तळलेले पदार्थ हाही एक मजेचा भाग असतो. मात्र, खरेच का उपवासाला साबुदाणा, भगर योग्य ठरते का, हा आरोग्यविषयक प्रश्न आहे. श्रावणमासासाेबत उपवासाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे आणि त्यात या पदार्थांचे दरही वाढतीवर आहेत.

उपवासाच्या पदार्थांचे दर (प्रति किलो)

पदार्थ १० जुलै १० ऑगस्ट

भगर ११० रुपये १२० रुपये

साबुदाणा ६० रुपये ६० रुपये

नायलॉन साबुदाणा ७० रुपये ८० रुपये

शेंगदाणे ११० रुपये १२० रुपये

दर का वाढले?

चातुर्मास सुरूच आहे आणि श्रावणमासापासून उपवास दिनात वाढ होत असते. त्यामुळे, या काळात साबुदाणा, भगर, शेंगदाणे किंवा अन्य उपवासजन्य पदार्थांचे दर थोड्या फार फरकाने वाढत असतात. फार काही बदल नसतो.

- चंदू जैन, व्यापारी

साबुदाणा आरोग्याला घातक

साबुदाणा, साबुदाण्याचे पदार्थ, भगर, बटाटे आदी पदार्थात कार्बोहायड्रेटचे प्रमाण अधिक असते. शिवाय, यामुळे शरीरातील शुगरचे प्रमाण वाढत असते. हे पदार्थ खाल्ल्याने सुस्ती येते व जडपणा वाढल्याने उपवासाच्या दिवशी करावयाच्या धार्मिक विधीत अडसर निर्माण होतो. त्यामुळे, साबुदाणा, भगरसारखे पदार्थ उपवासातून वर्ज्य करणेच योग्य असल्याचे मत आहारतज्ज्ञ डॉ. कविता गुप्ता यांनी व्यक्त केले.

उपवासाला हे पदार्थ घ्या

दूध, दही, ताक, ताजी फळे, ताज्या फळांचा ज्यूस, शेंगदाणे, पनीर, बदाम, अक्रोड, पिस्ता, मखाना, शिंगाड्याचे थालीपीठ आदी पदार्थ उपवासाला आहारात घ्यावे. हे पदार्थ तुमच्या दैनंदिन आहारात नसलेल्या व्हिटॅमिन्सची पूर्तता करतात. ड्रायफ्रूट्सचा उपवासाच्या आहारात समावेश केल्याने उत्तम ठरते.

उपवास म्हणजे विश्रांती

उपवास करणे ही धार्मिक व मनाला शांती प्रदान करणारी प्रक्रिया आहे. उपवास म्हणजे, त्या दिवशी दैनंदिन करणाऱ्या गोष्टींना एक दिवस सुटी देणे होय. यासोबतच उपवास वेगवेगळ्या प्रकारचेही असतात. संकल्प प्रण, हाही एक उपवासाचा भाग आहे. तंबाखू, सिगारेट ओढणाऱ्यांसाठी हा संकल्प उपवास महत्त्वाचा ठरतो. या गोष्टींपासून एक दिवस दूर राहण्याच्या संकल्पाने तटस्थवृत्तीला बळ मिळून व्यसन सोडण्यास प्रवृत्त होता येते.

..............

Web Title: Sabudana for fasting, no, Bappa!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.