ग्रामीण भागात काेराेचा आलेख चढतीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:09 IST2021-02-24T04:09:36+5:302021-02-24T04:09:36+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क हिंगणा/नरखेड/कळमेश्वर/कुही/काटाेल/रामटेक : ग्रामीण भागातही काेराेनाचे संक्रमण वाढत आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी मंगळवारी करण्यात आलेल्या काेराेना टेस्टमध्ये ...

In rural areas, the graph of Karae is on the rise | ग्रामीण भागात काेराेचा आलेख चढतीवर

ग्रामीण भागात काेराेचा आलेख चढतीवर

लाेकमत न्यूज नेटवर्क

हिंगणा/नरखेड/कळमेश्वर/कुही/काटाेल/रामटेक : ग्रामीण भागातही काेराेनाचे संक्रमण वाढत आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी मंगळवारी करण्यात आलेल्या काेराेना टेस्टमध्ये हिंगणा तालुक्यात सर्वाधिक २७ रुग्ण आढळून आले असून, नरखेड तालुक्यात १८, कळमेश्वरात १४, कुही तालुक्यात १२, काटाेलमध्ये १० तर रामटेक तालुक्यात सहा नवीन रुग्णांनी नाेंद करण्यात आली.

हिंगणा तालुक्यात २७ नवीन रुग्णांची नाेंद करण्यात आल्याने येथील एकूण रुग्णसंख्या ५,००१ झाली असून, यातील ३,९९२ रुग्ण काेराेनामुक्त झाले आहेत. शिवाय, १०१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मंगळवारी आढळून आलेल्या नवीन रुग्णांमध्ये वानाडाेंगरी येथील ११ रुग्णांसह कवडस येथील चार, वागदरा, हिंगणा, धानोली व उखळी प्रत्येकी दाेन, वडधामना, इसासनी, उमरी (वाघ) व रायपूर प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. नरखेडात तालुक्यात १८ नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे नरखेड शहरातील एकूण रुग्णांची संख्या ४२ तर ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या ६५ झाली आहे. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नरखेड तालुक्यातील मोवाड, भिष्णूर, खेडी व बोपापूर येथील प्रत्येकी एक, खरसोली येथील चार, जलालखेडा येथील सहा, वरुड (जिल्हा अमरावती) व काटोल येथील प्रत्येकी दाेन रुग्णांचा समावेश आहे.

कळमेश्वर तालुक्यात १४ नवीन रुग्णांची भर पडली आहे. यात कळमेश्वर-ब्राम्हणी शहरातील सात तर तालुक्यातील धापेवाडा येथील चार आणि तेलकामठी येथील तीन रुग्ण आहेत. कुही तालुक्यातील १२ नवीन रुग्णांची नाेंद करण्यात आली. यात एका शिक्षकाचाही समावेश आहे. नवीन रुग्णांमध्ये कुही शहरातील चार, मांढळ व तितूर येथील प्रत्येकी तीन व वेलतूर येथील दाेन रुग्णांचा समावेश आहे.

काटाेल तालुक्यातील १० नवीन रुग्ण आढळून आले. यात काटाेल शहरातील शारदा चौक, धंतोली, वडपुरा, अनसूयापुरम व तारबाजार येथील प्रत्येकी एक तर तालुक्यातील घरतवाडा येथील दाेन आणि पारडसिंगा, खडगी व रिधोरा येथील प्रत्येकी एक रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आला आहे. रामटेक तालुक्यातही मंगळवारी सहा नवीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे येथील एकूण रुग्णसंख्या १,०७३ झाली असून, यातील ९४८ रुग्ण काेराेनामुक्त झाले तर ४५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये रामटेक शहरातील गांधी वाॅर्ड व स्वामी विवेकानंद वाॅर्डमधील प्रत्येकी एक तर तालुक्यातील मनसर, नगरधन, मुसेवाडी व उमरी येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे.

...

बाजारातील गर्दी काेराेनाच्या पथ्यावर

काटाेल शहरात मंगळवारी आठवडी बाजार भरताे. बाजारात भाजीपाला व इतर साहित्य खरेदी करतेवेळी नागरिक गर्दी करत असून, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत नाही. शिवाय, बहुतांश नागरिक बाजारात व इतर ठिकाणी मास्क विना फिरताना आढळून येतात. नागरिकांचा हा हलगर्जीपणा काेराेनाच्या पथ्यावर पडत असल्याचेही काही जाणकार व्यक्तींनी सांगितले. याच कारणांमुळे चार दिवसांपासून काटाेल शहरासह तालुक्यात काेराेनाच्या रुग्णांमध्ये वाढ हाेताना दिसून येत आहे.

Web Title: In rural areas, the graph of Karae is on the rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.