शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या वाहनाने घेतला पेट : सुदैवाने प्राणहानी टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 20:41 IST

भाजीपाला घेऊन जात असलेल्या धावत्या छोट्या मालवाहू वाहनाने अचानक पेट घेतला. वाहनचालक व मालकाने वेळीच सावधगिरी बाळगत वाहन सोडून पळ काढला. त्यामुळे यात कुणालाही दुखापत झाली नाही. ही घटना कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोराडी-नागपूर मार्गावरील मॉडर्न स्कूल टी पॉर्इंटजवळ शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देनागपूर - कोराडी  मार्गावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्ककोराडी : भाजीपाला घेऊन जात असलेल्या धावत्या छोट्या मालवाहू वाहनाने अचानक पेट घेतला. वाहनचालक व मालकाने वेळीच सावधगिरी बाळगत वाहन सोडून पळ काढला. त्यामुळे यात कुणालाही दुखापत झाली नाही. ही घटना कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोराडी-नागपूर मार्गावरील मॉडर्न स्कूल टी पॉर्इंटजवळ शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.सचिन मोरे आणि केशव भातूलकर, दोघेही रा. इसापूर, ता. सावनेर यांनी एमएच-४०/वाय-२५४४ क्रमांकाच्या छोट्या मालवाहू वाहनात इसापूर येथील काही शेतकऱ्यांकडील भााजीपाला भरला आणि तो विकण्यासाठी नागपूर जाण्यास निघाले. सचिन वाहन चालवित होता. ते मॉडर्न स्कूलजवळ पोहोचताच वाहनाच्या इंजिनमधून मोठ्या प्रमाणात धूर निघायला सुरुवात झाली. त्यामुळे सचिनने वाहन रोडवर थांबवून उडी मारत पळ काढला. त्या पाठोपाठ केशव भातुलकरही वाहन सोडून दूरवर गेले. दोघांनीही या प्रकाराची माहिती लगेच कोराडी पोलिसांना दिली.पोलिसांनी तत्काळ कोराडी वीज केंद्रातील अग्निशमन दलाचे वाहन पाठविले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करीत आग नियंत्रणात आणली. वाहन रोडच्या मध्यभागी जळत असल्याने या मार्गावरील नागपूरच्या दिशेने जाणारी वाहतूक अर्धा तास ठप्प झाली होती. या घटनेत इसापूर येथील नारायण मोरे, सीमा बावणे, मोरेश्वर मोरे, बेबी शेंडे या शेतकऱ्यांचा भाजीपाला जळून खाक झाल्याने त्यांचे व वाहन मालकाचे नुकसान झाले.

टॅग्स :fireआगnagpurनागपूर