पहिलीत प्रवेशाची वयोमर्यादा घटणार; १५ दिवसांची सूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 12:54 IST2019-07-26T12:53:59+5:302019-07-26T12:54:24+5:30

सहा वर्षांचे वय पूर्ण होण्यासाठी काही दिवस कमी पडल्यामुळे पहिल्या इयत्तेत प्रवेश न मिळालेल्या पाल्यांच्या पालकांसाठी एक चांगली बातमी आहे. शिक्षण विभागाने एका निर्णयांतर्गत मुलांच्या वयोमर्यादेत काही प्रमाणात सूट देण्याचा अधिकार शाळांच्या मुख्याध्यापकांना दिला आहे.

Rule of first stranded admission will release; 15 days discount | पहिलीत प्रवेशाची वयोमर्यादा घटणार; १५ दिवसांची सूट

पहिलीत प्रवेशाची वयोमर्यादा घटणार; १५ दिवसांची सूट

ठळक मुद्देशिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना दिले अधिकार 

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सहा वर्षांचे वय पूर्ण होण्यासाठी काही दिवस कमी पडल्यामुळे पहिल्या इयत्तेत प्रवेश न मिळालेल्या पाल्यांच्या पालकांसाठी एक चांगली बातमी आहे. शिक्षण विभागाने एका निर्णयांतर्गत मुलांच्या वयोमर्यादेत काही प्रमाणात सूट देण्याचा अधिकार शाळांच्या मुख्याध्यापकांना दिला आहे. यानुसार मुख्याध्यापक मुलांना वयोमर्यादेत १५ दिवसांची सूट देऊ शकतात. म्हणजेच ५ वर्ष ११ महिने १५ दिवस पूर्ण करणाऱ्या मुलांनादेखील पहिलीत प्रवेश मिळू शकणार आहे.
विभागातर्फे अगोदर जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार पहिलीत प्रवेशासाठी ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत विद्यार्थ्यांचे वय ६ वर्ष पूर्ण हवे होते. याहून कमी वयाच्या विद्यार्थ्यांना पहिलीत प्रवेश न देण्याचे निर्देश देण्यात आले होते. विभागाच्या या निर्णयामुळे मोठ्या संख्येने मुलांना पहिलीत प्रवेश मिळू शकला नाही. त्यांना परत केजी-२ चाच अभ्यास करावा लागला. राज्य शिक्षण मंडळासोबतच ‘सीबीएसई’ व ‘आयसीएसई’ मंडळाच्या शाळांमध्येदेखील वयाचा हा नियम लागू करण्यात आला होता. मुलांना पहिल्या इयत्तेत प्रवेश न मिळाल्यामुळे मोठ्या संख्येने पालकांनी शिक्षण विभागाला तक्रार पाठविली होती; सोबतच वयोमर्यादेची अट शिथिल करण्याची मागणी केली होती.
शिक्षण विभागाकडून गुरुवारी जारी करण्यात आलेल्या शासन अध्यादेशानुसार पालकांच्या या मागणीवर विचार करीत शाळांच्या मुख्याध्यापकांना वयोमर्यादेत १५ दिवसांची सूट देण्याचा अधिकार देण्यात आला आहे. या निर्णयानंतर या मर्यादेत येणाºया विद्यार्थ्यांचे पहिलीत प्रवेश होऊ शकणार आहेत.

Web Title: Rule of first stranded admission will release; 15 days discount