शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात शिक्षकाचे विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 22:48 IST

शिक्षकांकडून शाळेतील विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन होत असल्याची तक्रार विद्यार्थिनींनी तक्रारपेटीत केली होती. विद्यार्थिनींनी केलेल्या तक्रारी शाळा प्रशासनाने जि.प.चे सीईओ संजय यादव यांच्याकडे केल्या आहेत. सीईओंनी याची गंभीर दखल घेत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश बजावले आहेत़

ठळक मुद्देविद्यार्थिनींची तक्रार : जि. प. कन्या शाळा सदर येथील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिक्षकांकडून शाळेतील विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन होत असल्याची तक्रार विद्यार्थिनींनी तक्रारपेटीत केली होती. विद्यार्थिनींनी केलेल्या तक्रारी शाळा प्रशासनाने जि.प.चे सीईओ संजय यादव यांच्याकडे केल्या आहेत. सीईओंनी याची गंभीर दखल घेत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश बजावले आहेत़मिळालेल्या माहितीनुसार, काटोल मार्गावरील जिल्हा परिषदेच्या जि. प. माध्यमिक कन्या शाळा, सदर येथील सहायक शिक्षक राजेंद्र मरसकोल्हे हे मागील अनेक दिवसांपासून शाळेतील इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन करीत असल्याबद्दल मुलींनी शाळेच्या तक्रारपेटीत तक्रारी टाकल्या होत्या. शाळेच्या मुख्याध्यापकाने त्या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेत त्याची एक प्रत जि. प.चे सीईओ संजय यादव यांच्याकडे पाठविली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत सीईओंनीही त्वरित या प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांना दिले आहेत़ मात्र, आज या तक्रारीला महिना लोटण्याच्या मार्गावर आहे, परंतु यावर शिक्षणाधिकाऱ्यांकडून कुठलीही कारवाई झाली नाही.मुख्याध्यापकाचे माझ्या विरोधात षड्यंत्रज्या मुख्याध्यापकांनी ही तक्रार केली़, ते चकोले सिनिअ‍ॅरिटी डावलून प्रभारी मुख्याध्यापकपदी रुजू झाले आहेत. याबाबत माझा संघटनात्मक वाद त्यांच्याशी सुरू आहे़ त्यांची दोनदा बदली करण्यात आली. राजकीय बळाचा वापर करून त्यांनी ती थांबविली़ मला केवळ एक वर्ष या शाळेत होत आहे़ अधिक काही पाऊल मी टाकेल म्हणून त्यांनी विद्यार्थिनींना हाताशी पकडून असा घृणास्पद प्रकार केला आहे. राजेंद्र मरसकोल्हे, सहायक शिक्षक, जि. प़ माध्यमिक कन्या शाळा

टॅग्स :MolestationविनयभंगTeacherशिक्षक