शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओ : खासगी ट्रॅव्हल्स बसचे भाडेदर निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 23:32 IST

प्रवाशांची होणारी लुबाडणूक थांबविण्यासाठी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार खासगी वाहनांचे भाडेदर निश्चित करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार एसटी महामंडळाच्या भाडेदराच्या तुलनेत जास्तीत जास्त दीडपट भाडे आकारण्याचे आदेश देण्यात आले.

ठळक मुद्देएसटी बसच्या दीडपटपर्यंत भाडे आकारण्याची मुभा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : प्रवाशांची होणारी लुबाडणूक थांबविण्यासाठी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार खासगी वाहनांचे भाडेदर निश्चित करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार एसटी महामंडळाच्या भाडेदराच्या तुलनेत जास्तीत जास्त दीडपट भाडे आकारण्याचे आदेश देण्यात आले. या पेक्षा अधिक भाडेदर आकारात असल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) कारवाई करावी, अशा सूचना परिवहन विभागाने दिल्या आहेत. त्यानुसार नुकतीच आरटीओने खासगी प्रवासी बसधारकांची बैठक घेऊन याबाबत माहिती दिली.सुट्यांचा हंगामात रेल्वेचे बुकिंग फुल्ल होते. त्यातच एसटीची सेवाही काहीशा अपूर्णच राहतात. प्रवाशांना खासगी बस किंवा ट्रॅव्हल्स कंपन्यांशिवाय पर्याय राहत नाही. याचा फायदा दरवर्षी घेतल्या जात असल्याचे नेहमीचे चित्र आहे. यासाठी खासगी ट्रॅव्हल्स बसचे भाडे निश्चित करण्याचा निर्णय गेल्याच वर्षी शासनाने घेतला. हे भाडेदर निश्चित करण्यासाठी पुण्याच्या केंद्र शासीत सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट (सीआयआरटी) संस्थेची नियुक्ती केली. या संस्थेने खासगी कंत्राटी वाहतुकीच्या विविध वर्गवारीतील सोयी सुविधांचा अभ्यास करुन अहवाल सादर केला. यात वातानुकूलीत (एसी), वातानुकूलीत नसलेली (नॉन एसी), शयनशान (स्लिपर), आसनव्यस्थेसह असलेली शयनयान (सेमी स्लिपर) वाहनांची वर्गवारी केली. एसटी बसच्या टप्पा वाहतुकीचे भाडेदर हे राज्य परिवहन प्राधिकरणाकडून निश्चित केले जाते. हे भाडेदर विचारात घेऊन खासगी वाहनाच्या संपूर्ण बससाठी प्रति कि.मी. भाडेदर हे त्याच स्वरुपाच्या एसटी महामंडळाच्या संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति कि.मी. भाडेदराच्या ५० टक्केपेक्षा (दीडपटीपेक्षा) अधिक राहणार नाही, असे कमाल भाडेदर निश्चित करण्याचा निर्णय घेतला. खासगी वाहनांना प्रवाशांकडून त्याच तुलनेत तिकीटदर आकारणे बंधनकारक केले. याची माहिती खासगी प्रवासी बसधारकांना होण्यासाठी नागपूर शहर आरटीओ कार्यालयाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी दीनकर मनवर यांच्या मार्गदर्शनात बैठक घेण्यात आली. यावेळी शहरातील विविध ट्रॅव्हल्स कंपनीचे व्यवस्थापक व वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. मनवर म्हणाले, शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या कमाल भाडेदरापेक्षा अधिक भाडे आकारल्याबाबत तक्रारी आल्यास व तपासणीमध्ये निदर्शनास आल्यास संबंधित बसधारकाच्याविरोधात मोटार वाहन कायदानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनीही या बैठकीला मार्गदर्शन केले.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसnagpurनागपूर