शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनात पालक गमाविलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाचा ‘आधार’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 12:47 IST

कोरोनाच्या पहिल्या दोन लाटांमध्ये अनेक कुटुंबांतील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. शिवाय अनेक विद्यार्थ्यांनी दोन्ही पालक गमाविले. विद्यापीठ किंवा महाविद्यालयांत शिक्षण घेणाऱ्या अशा विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी सिनेटमध्ये प्रस्ताव आला होता.

ठळक मुद्देशैक्षणिक खर्च उचलण्याबाबत चाचपणी विद्यार्थ्यांची यादी पाठविण्याची महाविद्यालयांची सूचना

नागपूर : कोरोनामुळे पालक गमाविलेल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने मदतीचा हात देण्याची तयारी सुरू केली आहे. यानुसार अशा सर्व विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च नागपूर विद्यापीठाकडून उचलण्यात येणार असून, त्यादृष्टीने अशा एकूण विद्यार्थी संख्येची चाचपणी करण्यात येत आहे. यासंदर्भात सर्व विभागप्रमुख तसेच संलग्नित महाविद्यालयांना पत्र पाठविण्यात आले आहे. दरम्यान, यासंदर्भात ठोस निर्णय झाला की नाही याबाबत विद्यापीठ वर्तुळातच संभ्रम आहे.

कोरोनाच्या पहिल्या दोन लाटांमध्ये अनेक कुटुंबांतील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. शिवाय अनेक विद्यार्थ्यांनी दोन्ही पालक गमाविले. विद्यापीठ किंवा महाविद्यालयांत शिक्षण घेणाऱ्या अशा विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी सिनेटमध्ये प्रस्ताव आला होता. यासंदर्भातील प्रस्ताव पुढे व्यवस्थापन परिषदेसमोर मांडण्यात आला. ६ डिसेंबर २०२१ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत यासंदर्भातील प्रस्ताव मंजूरदेखील झाला. यासंदर्भात विद्यापीठाने नुकतेच पत्र जारी केले. अशा सर्व महाविद्यालयांची यादी महाविद्यालयांचे प्राचार्य किंवा विभागप्रमुखांना बनवायची आहे. या निर्णयाची माहिती विद्यार्थ्यांना देण्याची जबाबदारीदेखील विभाग व महाविद्यालयांना देण्यात आली आहे. संबंधित नावे आवश्यक कागदपत्रांसह विद्यार्थी कल्याण विभागाकडे पाठविण्यात यावीत, अशी सूचना संचालक डॉ. अभय मुद्गल यांनी केली आहे.

संकेतस्थळावर पत्र का नाही?

अनेक विद्यार्थी विद्यापीठाच्या विविध निर्णयांबाबत संकेतस्थळावरूनच माहिती घेत असतात. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता अनेक विद्यार्थी ऑनलाइनच वर्ग करत आहेत. अशा स्थितीत त्यांना तातडीने माहिती मिळावी यासाठी विद्यापीठाने संकेतस्थळावर पत्र ‘अपलोड’ करणे अपेक्षित होते. याबाबत विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

दोनच दिवसांत दुरुस्ती पत्र

दरम्यान, यासंदर्भातील नेमका निर्णय झाला की नाही याबाबत विद्यापीठ वर्तुळातदेखील संभ्रम आहे. ३ जानेवारी रोजी जारी करण्यात आलेल्या पत्रात व्यवस्थापन परिषदेचा निर्णय झाला असून, अशा विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च करण्याबाबत माहिती सादर करावी, असे पत्रात नमूद होते. परंतु त्यानंतर बुधवारी दुरुस्तीपत्र काढण्यात आले व केवळ माहिती सादर करण्याबाबत हे पत्र असल्याचे स्पष्ट करण्यात आले. व्यवस्थापन परिषदेसमोर केवळ असा प्रस्ताव सादर करण्यात आला, असे नमूद आहे. त्यामुळे विद्यापीठात खरोखरच या विद्यार्थ्यांना आधार देण्याचा निर्णय झाला की नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :universityविद्यापीठEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या