शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

संघ कार्य हे ईश्वरी कार्य : मोहन भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 21:00 IST

संघ कार्य (राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे) हे ईश्वरी कार्य असून आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांची ही तपोभूमी आहे. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस यांच्या तपस्येतून येथील वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे देशभरातील स्वयंसेवकांसाठी हे स्थळ जागृत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे केले.

ठळक मुद्देस्मृती भवनाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संघ कार्य (राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे) हे ईश्वरी कार्य असून आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांची ही तपोभूमी आहे. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस यांच्या तपस्येतून येथील वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे देशभरातील स्वयंसेवकांसाठी हे स्थळ जागृत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे केले. 

रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हेडगेवार स्मारक समिती परिसरातील स्मृती भवनाच्या नवीन इमारतीच्या लोकार्पणप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सरकार्यवाह भय्याजी जोशी, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, महापौर नंदा जिचकार, खा. विकस महात्मे, जितेंद्रनाथ महाराज, मनमोहन वैद्य, माजी खा. अजय संचेती, प्रमिलाताई मेढे, शांताक्का, आ. परिणय फुके, आ. मिलिंद माने, आ. विकास कुंभारे, संदीप जोशी आदी उपस्थित होते.मोहन भागवत म्हणाले, नवीन इमारतीच्या उभारणीत देशभरातील लहान मोठ्या सर्वच स्वयंसेवकांचे योगदान आहे. अशा प्रकारच्या आवश्यकतेकडे आमचे लक्ष उशिरा जाते. जेव्हा आवश्यकता पूर्ण केली जाते, तेव्हापर्यंत आवश्यकता कितीतरी अधिक वाढलेली असते. इमारत झाली, त्याची देखभालही होईलच परंतु याहीपेक्षा अधिक महत्त्वाचे म्हणजे, देशभरातील स्वयंसेवकांनी डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी यांच्या जीवन कार्यापासून प्रेरणा घेऊन त्यांचे विचार व गुण आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.यावेळी भवनाच्या निर्मितीसाठी महत्त्वाचे योगदान देणारे अजित देशपांडे, अनिरुद्ध देशपांडे, हेमंत मुंडले, नरेंद्र बोबडे, नीलेश काटे, गजानन मडावी, निरंजन देशकर यांचा मोहन भागवत व भय्याजी जोशी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.संघचालक श्रीधरराव यांनी संचालन केले.४ माळे, ४० खोल्या, ४ हॉल
स्मृती भवनाची नवीन इमारत ही तळमजल्या व्यतिरिक्त चार माळ्यींची आहे. तळ मजल्यात प्रदर्शन भरवण्यासाठी जागा आहे. खाली कार्यालय, भोजन कक्ष, स्वागत कक्ष आहे. पहिल्या माळ्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक, सरकार्यवाह यांची खोली, स्वागत कक्ष, तसेच त्यांचे स्वीय सहायकांच्या खोल्या आहेत. दुसरा माळा ते चौथ्या माळ्यावर इतर पदाधिकाऱ्यांच्या खोल्या, भोजन कक्ष व सभागृह आहेत.