शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

रा. स्व. संघाचे मा. गो. वैद्य यांचे निधन, माजी बौद्धिक व प्रचार प्रमुखाच्या जाण्याने संघ वर्तुळात शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2020 05:53 IST

Ma Go Vaidya : ११ मार्च, १९२३ रोजी वर्धा जिल्ह्यातील तरोडा येथे जन्मलेल्या मा.गो. वैद्य यांनी ज्ञानदानाचेही कार्य केले. १९४६ ते १९६६ या कालावधीत ते प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.

नागपूर :  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी बौद्धिक व प्रचार प्रमुख, ज्येष्ठ पत्रकार माधव गोविंद (मा.गो.) उपाख्य बाबूराव वैद्य (वय ९७) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या निधनाने संघ वर्तुळात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, पाच मुले, नातवंडे असा परिवार आहे.११ मार्च, १९२३ रोजी वर्धा जिल्ह्यातील तरोडा येथे जन्मलेल्या मा.गो. वैद्य यांनी ज्ञानदानाचेही कार्य केले. १९४६ ते १९६६ या कालावधीत ते प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. १९६६ मध्ये ते पत्रकारितेत आले. १९७८ ते १९८४ या कालावधीत ते विधान परिषदेचे नामनियुक्त सदस्यही होते. संघाच्या मुशीतच घडलेले ‘मा.गो.’ यांनी अ. भा. बौद्धिक प्रमुख, अ.भा. प्रचार प्रमुख, प्रवक्तेपद या जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या. याशिवाय २००८ सालापर्यंत ते संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाचे निमंत्रित सदस्यही होते. साहित्य क्षेत्रातही त्यांनी ठसा उमटविला होता. २२ पुस्तकांचे लेखन त्यांच्या हातून झाले.

आज अंत्यसंस्कारप्रतापनगर येथील त्यांच्या राहत्या घरून रविवारी सकाळी ९.३० वाजता अंत्ययात्रा निघेल व अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार होतील.

मा. गो. वैद्य हे प्रतिष्ठित लेखक आणि पत्रकार होते. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामात मोठे योगदान दिले. भाजपला मजबूत करण्यासाठीही त्यांनी मेहनत घेतली. त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या दु:खात मी सहभागी आहे.    - नरेंद्र मोदी, पंतप्रधान  

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूर