सरसंघचालक मोहन भागवत आले ट्विटरवर..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 10:47 IST2019-07-01T10:44:17+5:302019-07-01T10:47:46+5:30
सरसंघचालक मोहन भागवत यांनी अलीकडेच आपले ट्विटर अकाऊंट सुरू केले आहे. मात्र त्यावर त्यांनी अद्याप एकही पोस्ट टाकलेली नाही.

सरसंघचालक मोहन भागवत आले ट्विटरवर..
योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: सरसंघचालक मोहन भागवत यांनी अलीकडेच आपले ट्विटर अकाऊंट सुरू केले आहे. मात्र त्यावर त्यांनी अद्याप एकही पोस्ट टाकलेली नाही. असे असले तरी, त्यांचे ट्विटर अकाऊंट सुरू होताच त्यांना तब्बल पाच हजारांहून अधिक लोकांनी फॉलो करणे सुरू केले आहे.
खुद्द मोहन भागवत हे मात्र फक्त एकाच ट्विटर अकाऊंटला फॉलो करताना दिसत आहेत, ते आहे रा.स्व. संघाचे अकाऊंट.
सरसंघचालक हे आजवर सोशल मिडियावर कधीही दिसले नाहीत. त्यामागे काही खास कारण असे नसले तरी, त्यांनी आजवर प्रसार व प्रचाराचे हे सर्वाधिक लोकप्रिय व वेगवान माध्यम कधी हाताळले नव्हते. त्यांच्या ट्विटर अकाऊंटने त्यांची ही कसर भरून काढली आहे.