शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नागपूर मनपावर ४५० कोटींचे कर्ज; २०० कोटींची कंत्राटदारांची देणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 20:09 IST

महापालिकेने गेल्या काही वर्षात ६६७.६३ कोटींचे कर्ज घेतले होते. यातील ४५० कोटींच्या कर्जाची अजूनही परतफेड करावयाची आहे. कंत्राटदांना दिवाळीत ४० टक्के रक्कम दिल्यानंतरही २०० कोटींची देणी आहे. दुसरीकडे महापालिकेच्या तिजोरीत वित्त वर्षात नोव्हेंबर अखेरीस ९९७.०७ कोटींचा महसून महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला. यात ७०० कोटींचे अनुदान व महापालिकेच्या आर्थिक स्त्रोतून प्राप्त झालेल्या २७९ कोटींचा समावेश आहे. पुढील चार महिन्यात उत्पन्नात फारशी वाढ होण्याची शक्यता नाही. बिकट आर्थिक स्थितीचा विचार कररता राज्य सरकारने महापालिकेला ७०० कोटींंचे विशेष अनुदान द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गटनेते वेदप्रकाश आर्य यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्देशासनाने ७०० कोटींचे अनुदान द्यावे :आठ महिन्यात २७९ कोटींचे उत्पन्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेने गेल्या काही वर्षात ६६७.६३ कोटींचे कर्ज घेतले होते. यातील ४५० कोटींच्या कर्जाची अजूनही परतफेड करावयाची आहे. कंत्राटदांना दिवाळीत ४० टक्के रक्कम दिल्यानंतरही २०० कोटींची देणी आहे. दुसरीकडे महापालिकेच्या तिजोरीत वित्त वर्षात नोव्हेंबर अखेरीस ९९७.०७ कोटींचा महसून महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला. यात ७०० कोटींचे अनुदान व महापालिकेच्या आर्थिक स्त्रोतून प्राप्त झालेल्या २७९ कोटींचा समावेश आहे. पुढील चार महिन्यात उत्पन्नात फारशी वाढ होण्याची शक्यता नाही. बिकट आर्थिक स्थितीचा विचार कररता राज्य सरकारने महापालिकेला ७०० कोटींंचे विशेष अनुदान द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गटनेते वेदप्रकाश आर्य यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.राज्य सरकाने गेल्या महिन्यात १५० कोटींचे अनुदान उपलब्ध केले. परंतु सध्याची महापालिकेची आर्थिक, कर्जाचे ओझे व थकीत देणीचा विचार करता ही रक्कम पुरेशी नाही. महापालिकेचा मुख्य आर्थिक स्त्रोत असलेल्या मालमत्ता कर, नगररचना, पाणीपट्टी, बाजार विभागव अनय बाबीतून एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत जेमतेम २७९ कोटींचा महसूल जमा झाला. एलबीटी अनुदान, विशेष निधी व मुद्रांक शुल्क व अन्य अनुदानापोटी ७०० कोटीं राज्य सरकारकडून मिळाल्याची माहिती माहिती अधिकारात प्राप्त झाल्याची माहिती वेदप्रकाश आर्य यांनी दिली.महापालिकेचा २०१८-१९ या वर्षाचा अर्थसंकल्प २९०० कोटींचा असला तरी गेल्या आठ महिन्यात तिजोरीत ९७९ कोटींचा महसूल जमा झाला. विशेष अनुदान मिळाल्याने दिवाळीपूवी कंत्राटदारांना ४० टक्के रक्कम देता आली. परंतु अजूनही त्यांची मोठ्याप्रमाणात थकबाकी आहे. कर्जाची परतफेड करावयाची आहे. आर्थिक स्थिती बकिट असल्याने आवश्यक बाबीवरील खर्चानंतर विकास कामांसानिधी शिल्लक राहात नसल्याने प्रभागातील विकास कामे ठप्प आहेत. नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे विशेष निधी मिळाला तरच महापालिकेची आर्थिक स्थिती सावरून नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध होतील. असे मत वेदप्रकाश आर्य यांनी व्यक्त केले.महापालिकेने घेतलेले कर्ज व शिल्लक कर्जबँक वा वित्तीय संस्था            रक्कम (कोटीत)          शिल्लक कर्जमहाराष्ट्र जीवन प्राधिकरण     ६५.०२                       ६५.०२एलआयसी                            २३.६१                       २३.६१बँक आॅफ महाराष्ट्र(पेंच टप्पा ४) २००                     १६.९८बँक आॅफ महाराष्ट्र(विकास कामासाठी) २००          १५९.२१वाढीव पाणीपुरवठा योजना        १०                           ९.५४बँक आॅफ महाराष्ट्र(पथदिवे)      ५९                            ५९एमयूआयएनएफआरए               २०                            २०एकूण                                 ६६७.६३                 ४३९.२९

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर