शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मेयोला शिर्डीच्या साईबाबांचा ३५.२८ कोटींचा प्रसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 23:09 IST

इंदिरा गांधी शासकीय आरोग्य महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) स्नातक व स्नातकोत्तर जागांवर असलेले संकट शिर्डीच्या साईबाबांनी दूर केले आहे. मेयोतील त्रुटी दूर करण्यासाठी राज्य शासनाच्या पुढाकाराने श्री शिर्डी साईबाबा संस्थानने मेयोमध्ये लागणारी विविध उपकरणे आणि सुविधांसाठी ३५.२८ कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे.

ठळक मुद्देसंकट टळणार : सिटी, एमआरआयसह विविध उपकरणांसाठी मदत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर. इंदिरा गांधी शासकीय आरोग्य महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) स्नातक व स्नातकोत्तर जागांवर असलेले संकट शिर्डीच्या साईबाबांनी दूर केले आहे. मेयोतील त्रुटी दूर करण्यासाठी राज्य शासनाच्या पुढाकाराने श्री शिर्डी साईबाबा संस्थानने मेयोमध्ये लागणारी विविध उपकरणे आणि सुविधांसाठी ३५.२८ कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे.या उपकरणांमध्ये नवीन सिटी स्कॅन मशीन, एमआरआय आणि डिजिटल सब्स्ट्रेक्शन अ‍ॅन्जियोग्राफीच्या (डीएसए) आवश्यक निधीला मंजुरी दिली आहे. याशिवाय काही उपकरणांसाठी संस्थानने मदत केली आहे.दीनदयाल थाळीच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमक्ष अधिष्ठाता डॉ. अनुराधा श्रीखंडे यांनी रुग्णालय आणि कॉलेजच्या समस्या आणि अडचणींची माहिती दिली होती. शिवाय जागांवरील संकट आणि अपुऱ्या कर्मचाºयांचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. मेयोकरिता दोनदा सिटी स्कॅन आणि एमआरआर मशीनकरिता निधीची घोषणा झाली, पण मंजूरी मिळाली नव्हती. जुन्या मशीन खराब झाल्या आहेत.मेयोच्या अधिष्ठाता डॉ. श्रीखंडे यांनी निधीला मंजुरी दिल्यानंतर श्री साईबाबा संस्थानसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य शिक्षण मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले आहे. यामुळे आता जागांवर असलेले संकट दूर होणार असल्याचे श्रीखंडे यांनी म्हटले आहे.या उपकरणांची होणार खरेदीजवळपास एक डझन मशीनसाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीला मंजूरी मिळाली आहे. यामध्ये १२ कोटी रुपयांची १.५ टेस्ला एमआरआय मशीन, ७ कोटी रुपयांची सिटी स्कॅॅन मशीन, ६ कोटींची डीएसए, ६ कोटींचा मॅकेनाइज्ड लाऊंड्री प्रकल्प, १.५ कोटींचे १० पीडिएट्रिक अ‍ॅण्ड नियोनेटल व्हेंटिलेटर, १.२ कोटी रुपयांचे १० एडल्ट व्हेटिलेटर आदींचा समावेश आहे. याच प्रकारे मल्टीपॅरा मॉनिटर, अ‍ॅडव्हान्स वायपॅप मशीन, यूएसजी मशीन, सर्वो कंट्रोल्ड वार्मर आदी मशीनकरिता लाखोंच्या निधीला मंजुरी मिळाली आहे.

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)saibabaसाईबाबा