शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
3
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
4
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
5
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
6
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
7
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
8
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
9
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
10
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
11
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
12
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
13
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
14
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
15
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
16
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
17
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
18
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
19
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
20
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार

सेवाग्राम आणि बडनेरातील अट्टल चोरट्यांना आरपीएफने ठोकल्या बेड्या

By नरेश डोंगरे | Updated: March 14, 2024 21:12 IST

चोरीच्या गुन्ह्यांची कबुली : दोघांकडूनही रोख रक्कम जप्त

नागपूर: रेल्वे गाड्या आणि रेल्वे स्थानक परिसरात चोऱ्या करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने बेड्या ठोकल्या. यातील एक भामटा सेवाग्राम (वर्धा) येथील असून दुसरा बडनेरा (अमरावती) येथील रहिवासी आहे.

आरपीएफचे जवान रेल्वेगाड्या येता-जाताना प्लेटफॉर्मवर प्रत्यक्ष आणि सीसीटीव्ही कंट्रोल रूमच्या माध्यमातून लक्ष ठेवून असतात. अशाच प्रकारे ट्रेन नंबर १२८३३ हावडा सुपरफास्ट ट्रेन नागपूर स्थानकाच्या फलाट क्रमांक ६ वर आली असताना त्यातून दोन व्यक्ती संशयास्पदरित्या खाली उतरताना दिसले. ते पाहून कर्तव्यावर असलेले आरपीएफचे उपनिरीक्षक एच. एल. मिना, सीताराम जाट, हवलदार कपिल झरबडे, कुंदन फुटाणे, निरज कुमार, रवींद्र कुमार आणि विना सोरेन तसेच जीआरपीचे सुशील वासनिक आणि सतीश बुरडे यांनी या दोघांना शिताफिने पकडले. पोलीस ठाण्यात या दोघांची पीएसआय सुभाष मडावी आणि ठाणेदार आर. एल. मिना यांनी वेगवेगळी विचारपूस केली असता एकाने त्याचे नाव अजय सूर्यभान भगत (वय५०, रा. आदर्शनगर, सेवाग्राम, जि. वर्धा) आणि दुसऱ्याने अविनाश सुभाष चाैधरी (वय ३६, रा. अशोकनगर, नवीन वस्ती, बडनेरा, जि. अमरावती) सांगितले. ९ मार्चला रेल्वे स्थानकवरच्या कॅनरा बँकेच्या एटीएमजवळ झोपून असलेल्या व्यक्तीच्या खिशातून मोठी रोकड चोरल्याची कबुली दिली. त्यातील २२७० रुपयेही त्याने आरपीएफच्या हवाली केले.

अनेक चोऱ्या उघड होण्याची शक्यतादुसरा चोरटा चाैधरी याने २ मार्चला हावडा सुपरफास्ट ट्रेन मधून एका व्यक्तीची रोकड लांबविल्याची कबुली दिली. त्याने या चोरीतील ५२५० रुपये आरपीएफच्या हवाली केले. या दोघांनाही नंतर आरपीएफने रेल्वे पोलिसांच्या हवाली केले. त्यांच्याकडून आणखी काही चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता असून, रेल्वे पोलीस त्यांची चाैकशी करीत आहेत.

टॅग्स :Sewagramसेवाग्रामnagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी