लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे सुरक्षा दलाच्या नागपूर विभागाने उमरेडच्या इतवारी बाजार भागातील जलाराम एजन्सीजवर धाड टाकून रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार उघडकीस आणला. प्रतिष्ठान संचालकाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून ५.१२ लाख रुपये किमतीची ३१५ तिकिटे जप्त करण्यात आली.भावेन अनिल उन्नरकर (३४, रा. इतवारी, उमरेड) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या मालकीचे इतवारी भागातच जलाराम एजन्सी नावाचे प्रतिष्ठान आहे. तेथून रेल्वे तिकिटांचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती आरपीएफला मिळाली होती. वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडेय यांच्या सूचनेनुसार सहायक सुरक्षा आयुक्त सुमन नाला यांच्या नेतृत्वात पथक स्थापन करण्यात आले. त्यात उपनिरीक्षक सचिन दलाल, एस. पी. सिंह, अश्विन पवार, अमित बारापात्रे, अश्विनी मूलतकर यांचा समावेश होता. कारवाईसाठी स्थानिक पोलिसांचेही सहकार्य घेण्यात आले. संयुक्त पथकाने जलाराम एजन्सीवर धाड टाकली. आयआरसीटीसीच्या परवान्याबाबत विचारणा केली असता भावेनने परवानाधारक असल्याची माहिती दिली. तिकिटांच्या काळाबाजारासंदर्भात विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. जवानांनी त्याला ताब्यात घेत नागपूर ठाण्यात आणले. सोबत त्याचा मोबाईल व संगणक जप्त करण्यात आला. आरोपीने या संगणकाच्या माध्यमातून अनेकदा तिकीट काढल्याचे निष्पन्न झाले. अधिक चौकशी केली असता त्याने जास्त पैसे घेऊन प्रवाशांना तिकीट विक्री केल्याचे कबूल केले. त्याने आजपर्यंत ५ लाख १२ हजार ४७६ रुपये किमतीची ३१५ तिकिटे विकल्याचे निष्पन्न झाले.
नागपुरात आरपीएफने केली ५.१२ लाखाची ई-तिकिटे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 00:05 IST
रेल्वे सुरक्षा दलाच्या नागपूर विभागाने उमरेडच्या इतवारी बाजार भागातील जलाराम एजन्सीजवर धाड टाकून रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार उघडकीस आणला. प्रतिष्ठान संचालकाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून ५.१२ लाख रुपये किमतीची ३१५ तिकिटे जप्त करण्यात आली.
नागपुरात आरपीएफने केली ५.१२ लाखाची ई-तिकिटे जप्त
ठळक मुद्देउमरेडच्या जलाराम एजन्सीजवर धाड