शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात आरपीएफने पकडला ४.२४ लाखाचा गांजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 22:28 IST

रेल्वे सुरक्षा दलाने बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरून ४ लाख २४ हजार ८०० रुपये किमतीचा ४२.४८० किलो गांजा जप्त केला आहे.

ठळक मुद्दे प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरून ४ लाख २४ हजार ८०० रुपये किमतीचा ४२.४८० किलो गांजा जप्त केला आहे.रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक रवी जेम्स, उपनिरीक्षक एस. पी. सिंह बुधवारी सायंकाळी प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर गस्त घालत होते. त्यांना इटारसी एण्डकडील भागात ठेवलेल्या पार्सलमधून गांजासारखा उग्र वास आला. तेथे तीन पोते ठेवलेले होते. तेथील पार्सल क्लर्कला विचारणा केली असता त्याने खासगी हमालांनी हे पोते रेल्वेगाडी क्रमांक ०२८०५ मधून चुकीने उतरविले असून हे पोते नागपूरचे नसल्याची माहिती दिली. तेथे सहायक सुरक्षा आयुक्त कोटा जोजी व पंचासमक्ष पोत्यांची तपासणी केली. त्यात २० पाकिटात ४ लाख २४ हजार ८०० रुपये किमतीचा ४२.४८० किलो गांजा आढळला. जप्त केलेला गांजा लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला. ही कारवाई विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

टॅग्स :railwayरेल्वेraidधाड