शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आरपीएफ जवानाने वाचविले महिला प्रवाशाचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 00:49 IST

भावाला राखी बांधून गोंदियावरून आलेली एक महिला गाडीखाली उतरताना अस्वस्थ वाटून अचानक बेशुद्ध झाली. आरपीएफ जवान आणि महिला कॉन्स्टेबलने कृत्रीम श्वासोच्छवास देऊन या महिलेचे प्राण वाचविले.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : भावाला राखी बांधून गोंदियावरून आलेली एक महिला गाडीखाली उतरताना अस्वस्थ वाटून अचानक बेशुद्ध झाली. ड्युटीवर असलेल्या आरपीएफ जवान आणि महिला कॉन्स्टेबलने कृत्रीम श्वासोच्छवास देऊन या महिलेचे प्राण वाचविले. ही घटना नागपूररेल्वेस्थानकावर रविवारी सायंकाळी ५.१५ वाजताच्या दरम्यान घडली.ममता टेंभरे (४०) रा. महादुला, कोराडी असे त्या महिलेचे नाव आहे. त्यांच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रक्षा बंधनानिमित्त त्या गोंदियाला असलेल्या भावाला राखी बांधण्यासाठी गेल्या होत्या. रविवारी १२१०६ गोंदिया - मुंबई विदर्भ एक्स्प्रेसने त्या नागपुरात आल्या. त्यांच्या सोबत दोन बहिणी, दोन मुले आणि नातेवाईक होते. त्या महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यातून प्रवास करीत होत्या. या गाडीत प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. नागपूर रेल्वे स्थानकावर गाडी येताच चढणाऱ्यांची आणि उतरणाऱ्यांची एकच गर्दी झाली. अशातच ममता घामाघूम झाल्या. त्यांना श्वास घेता येत नव्हता. समोरचे काहीच दिसेनासे झाले. शरीरही थंड पडायला लागले. नातेवाईकांनी लगेच प्लॅटफार्मवर झोपविले. दरम्यान आरपीएफच्या महिला आरक्षक निता माजी, आरक्षक ब्रिजभूषण यादव, सहायक उपनिरीक्षक रामनिवास यादव, सुषमा ढोमणे आणि कामसिंग ठाकूर हे कर्तव्यावर असताना त्यांना गर्दी दिसली. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी प्रवाशांना बाजूला हटविले. निता माजी यांनी महिलेची स्थिती पाहुन तिला तोंडाने कृत्रीम श्वास दिला. तर त्यांच्या मुलांनी हार्ट पंपींग केली. आरपीएफ महिला कॉन्स्टेबल सुषमा ढोमणे यांनी ठाण्यात फोन करून घटनेची माहिती दिली. बॅटरी कार चालकाला बोलाविण्यात आले. कॉन्स्टेबल महेश गिरी यांनी उपस्टेशन व्यवस्थापकांना सांगून रेल्वे डॉक्टरची व्यवस्था केली. बॅटरी कार पोहोचल्यानंतर ममता टेंभरे यांना लगेच बॅटरी कारने प्लॅटफार्म क्रमांक १ वर आणण्यात आले. रेल्वे डॉक्टरांनी तपासल्यानंतर या महिलेस मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून प्रकृती धोक्याबाहेर आहे.

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर