कुही, मांढळ शहरात पाेलिसांचा रूट मार्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:08 IST2021-04-18T04:08:45+5:302021-04-18T04:08:45+5:30
कुही : वाढते काेराेना संक्रमण राेखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने पाेलिसांनी कुही व मांढळ शहरात रूट मार्च केला. नागरिकांनी ...

कुही, मांढळ शहरात पाेलिसांचा रूट मार्च
कुही : वाढते काेराेना संक्रमण राेखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने पाेलिसांनी कुही व मांढळ शहरात रूट मार्च केला. नागरिकांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा, विनाकारण घराबाहेर फिरणे टाळावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
कुही नगर पंचायत व मांढळ ग्रामपंचायतचे अधिकारी, कर्मचारी, पाेलीस अधिकारी व आपत्ती व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या सहभागाने काढण्यात आलेल्या रूट मार्चचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. कुही पाेलीस ठाण्याच्या आवारातून सुरुवात झाल्यानंतर कुही व मांढळ शहरातील विविध मार्गांनी भ्रमण करून जनजागृती करण्यात आली. किराणा दुकानात शारीरिक अंतराच्या नियमाचे पालन करावे, रस्त्याने विनाकारण फिरू नये, कुठेही गर्दी करू नये, चाैकात घाेळक्याने बसू नये साेबतच काेराेना प्रतिबंधात्मक उपाययाेजनांबाबत पाेलिसांनी जनजागृती केली. नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाईचा इशाराही यावेळी दिला. यावेळी उपविभागीय पाेलीस अधिकारी भीमराव टेळे, पाेलीस निरीक्षक चंद्रकांत मदने, पाेलीस उपनिरीक्षक भारत थिटे, शुभांगी तकीत, गुरूकर यांच्यासह पाेलीस कर्मचारी व हाेमगार्ड जवान सहभागी झाले हाेते.