नरखेड पाेलिसांचा रूट मार्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:08 IST2021-04-16T04:08:16+5:302021-04-16T04:08:16+5:30
नरखेड : शहरासह तालुक्यात काेराेना संक्रमणात वाढ हाेत आहे. हे संक्रमण राेखण्यासाठी नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययाेजनांचे पालन करावे म्हणून जनजागृती ...

नरखेड पाेलिसांचा रूट मार्च
नरखेड : शहरासह तालुक्यात काेराेना संक्रमणात वाढ हाेत आहे. हे संक्रमण राेखण्यासाठी नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययाेजनांचे पालन करावे म्हणून जनजागृती करण्यासाठी नरखेड पाेलिसांनी गुरुवारी (दि. १५) नरखेड शहरात रूट मार्च केला.
काेराेना संक्रमण राेखण्यासाठी शासनाने काही उपाययाेजना जाहीर केल्या असल्या, तरी वारंवार आवाहन करूनही काही नागरिक त्या उपाययाेजनांची पायमल्ली करत बेफिकीरपणे वागत आहेत. त्यांचा हा बेफिकीरपणा काेराेना संक्रमणाच्या पथ्यावर पडणारा ठरत असून, नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी नरखेड पाेलिसांनी रूट मार्च केला. यावेळी त्यांनी नागरिकांना शासनाने काेराेनासंदर्भात जारी केलेल्या दिशानिर्देशांचे पालन करावे, मास्कचा नियमित वापर करावा, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, गर्दी करू नये, विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, विनाकारण राेडवर फिरू नये, नागरिकांनी लपूनछपून लग्न व सामाजिक कार्यक्रमांचे आयाेजन करू नये, यासह अन्य बाबींवर जनजागृती केली. या उपाययाेजनांची पायमल्ली केल्यास कठाेर कारवाई करण्याचा इशाराही पाेलिसांनी दिला. दरम्यान, नरखेड पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सावरगाव व माेवाड येथे नाकाबंदीही करण्यात आली आहे. या रूट मार्चमध्ये ठाणेदार जयपालसिंग गिरासे, नरखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रवीण मानकर, प्रशासन अधिकारी याेगेश कुरेकर यांच्यासह पाेलीस व नगर परिषदेचे कर्मचारी तसेच हाेमगार्ड सहभागी झाले हाेते.