शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दुर्दैवी... पाळण्याची दोरी बनली फास; छोट्या भावाशी खेळताना मुलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 11:13 IST

नऊ वर्षीय चिमुकल्याचा पाळण्यावर खेळता खेळता गळफास लागून मृत्यू झाला. बाराद्वारी कापसी खुर्द येथे शनिवारी रात्री ७ च्या सुमारास उघड झालेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

ठळक मुद्देचिमुकल्याच्या मृत्यूने कापसीत शोककळापारडीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रकृती चांगली नसल्याने छोट्या भावावर लक्ष ठेवण्यासाठी त्याच्या अवतीभवती खेळणाऱ्या नऊ वर्षीय चिमुकल्याचा पाळण्यावर खेळता खेळता गळफास लागून मृत्यू झाला. बाराद्वारी कापसी खुर्द येथे शनिवारी रात्री ७ च्या सुमारास उघड झालेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मोहित नरेंद्र ढोरे असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.मोहितचे आई-वडील अत्यंत गरीब आहेत. ते मोलमजुरी करतात. मोहित गावातील शाळेत शिकत होता. त्याला एक लहान भाऊ असून, त्याची प्रकृती चांगली नसल्यामुळे शाळेतून आल्यानंतर त्याच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी मोहितवर सोपवून त्याचे आई-वडील शनिवारी कामाला निघून गेले. रात्री ७ च्या सुमारास मोहितची आई घरी परतली तेव्हा तिला मोहित पाळण्याच्या दोरीला गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. तिने किंकाळी फोडल्यामुळे आजूबाजूची मंडळी धावून आली. पाळण्याच्या दोरीने लागलेला मोहितचा गळफास काढून शेजाऱ्यांनी त्याला मेयोत नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती कळताच पारडी पोलीस ठाण्याचे हवालदार मुरलीधर ठोंबरे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.अशी घडली असावी घटनातब्येत बरी नसलेल्या भावाच्या शेजारी मोहित खेळत होता. तो पलंगावर पाय ठेवून पाळण्याच्या दोरीला लटकून झोके घेत असावा, त्याचा पाय घसरून पाळणा उलटा फिरल्याने दोरी त्याच्या गळ्याभोवती आवळली गेली असावी आणि निरागस मोहित त्यातून सुटका करून घेण्यासाठी धडपड करीत असताना फास घट्ट होत गेला असावा, असा या घटनेच्या संबंधाने पोलिसांचा कयास आहे.

टॅग्स :Deathमृत्यू