काेंढाळी पाेलिसांचा रूट मार्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:07 IST2021-04-17T04:07:54+5:302021-04-17T04:07:54+5:30
काेंढाळी : वाढते काेराेना संक्रमण राेखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने पाेेलिसांनी काेंढाळी (ता. काटाेल) दुपारी रूट मार्च केला. स्थानिक ...

काेंढाळी पाेलिसांचा रूट मार्च
काेंढाळी : वाढते काेराेना संक्रमण राेखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने पाेेलिसांनी काेंढाळी (ता. काटाेल) दुपारी रूट मार्च केला. स्थानिक नागरिकांसह व्यापारी संघाच्या सदस्यांनी या रूट मार्चचे ठिकठिकाणी स्वागत केले.
स्थानिक पाेलीस ठाण्याच्या आवारातून या रूट मार्चला सुरुवात करण्यात आली. बाजारचौक, शनिचरा, बस परिसरासह विविध मार्गाने भ्रमण करीत हा रूट मार्च पाेलीस ठाण्याच्या आवारात परत आला. काेराेना संक्रमण वाढत असल्याने नागरिकांनी मास्कचा वापर करावा, विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, दुकानांसमाेर फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, राेडवर विनाकारण फिरू नये, कुठेही गर्दी करू नये यासह अन्य काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांबाबत पाेलिसांनी जनजागृती केली. याचे काटेकाेर पालन करण्याचे पाेलिसांनी आवाहन केले असून, उल्लंघन केल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला. स्थानिक बाजारचाैकात ग्रामपंचायत सदस्य कमलेश गुप्ता व व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी फुलांचा वर्षाव करीत पाेलिसांचे स्वागत केले. स्वागत करण्यापेक्षा प्रत्येकाने काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे काटेकाेर पालन करावे, असे आवाहन ठाणेदार विश्वास फुल्लरवार यांनी केले. विश्वास फुल्लरवार यांच्या नेतृत्वातील या रूट मार्चमध्ये सहायक पोलीस निरीक्षक प्रभू ठाकरे, उपनिरीक्षक देवेंद्र सोनावले व राम ढगे यांच्यासह सर्व पाेलीस कर्मचारी व हाेमगार्ड सहभागी झाले हाेते.