शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

'रुफ फ्लॅप ब्रेक सिस्टीम' ने मिळवू शकतील अपघातावर नियंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 00:46 IST

झपाट्याने चारचाकी वाहने वाढली आणि त्याच गतीने अपघातही वाढले. अपघाताची तीव्रता कशी कमी करता येईल, या दृष्टिकोनातून नागपुरातील निखिल उंबरकर यांनी ‘रुफ प्लॅप ब्रेक सिस्टीम’ तयार केली आहे.

ठळक मुद्देनागपूरच्या युवकाचे संशोधन : सिस्टीमचे मिळविले पेटेंट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रस्ते हे विकासाचे द्योतक मानले जातात. गेल्या पाच वर्षात देशभरात रस्त्यांचे जाळे झपाट्याने विणल्या गेले. तेवढ्याच झपाट्याने चारचाकी वाहने वाढली आणि त्याच गतीने अपघातही वाढले. नागपुरातील निखिल उंबरकर हे रस्त्यावरील अपघाताची कारणमीमांसा व उपाययोजनावर संशोधन करीत आहे. हे संशोधन करताना अपघाताची तीव्रता कशी कमी करता येईल, या दृष्टिकोनातून त्यांनी ‘रुफ प्लॅप ब्रेक सिस्टीम’ तयार केली आहे. त्यांनी या यंत्रणेचे पेटेंटही केले असून, त्यांचा दावा आहे की, त्यांच्या या यंत्रणेमुळे हायवेवरील अपघातावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळू शकते.निखील यांचे स्वत:चे कारचे सर्व्हिस स्टेशन आहे. निखिलच्या मते वाहनांची गती वाढविण्यासाठी कार कंपन्या कमी वजनाचे साहित्य वापरतात. गती, वेग हाच अपघाताचे मुख्य कारण आहे. हायवेवरील अपघाताचा अभ्यास करताना त्यांच्या लक्षात आले की, वाहनांचा वेग १२०, १४०, १६० पर्यंत असतो. या वेगात वाहन धावत असताना अनवधानाने एखादा अडथळा आला की सपाट्याने ब्रेक मारला जातो. त्यामुळे वाहन अनियंत्रित होऊन एखाद्या वाहनाला धडकते, वाहन रस्त्यावर उलटते आणि मोठा अपघात होतो. वाहन वेगात असताना जोरात ब्रेक मारल्यामुळे वाहनाचा मागचा भाग वर उठतो. टायरची रस्त्यावरची ग्रीप सुटते. वाहन अनियंत्रित होऊन मोठा अपघात होतो. या दृष्टिकोनातून निखिल यांनी स्वत:च्या चार चाकी वाहनाच्या छतावर एक फ्लॅप लावला आहे. हा फ्लॅप १२० च्यावर गाडीचा वेग असताना ब्रेक मारल्यास उघडतो. या फ्लॅपमुळे हवा अडली जाते व हवेचा दाब गाडीवर पडतो, परिणामी गाडीचा वेग कमी होतो. गाडी रस्ता सोडत नाही, टायर रस्त्याला चिपकून असतात. त्यामुळे गाडी अनियंत्रित होत नाही ठराविक अंतरापूर्वीच गाडी थांबते. याचे प्रात्याक्षिक त्यांनी स्वत:च्या गाडीवर केले आहे. त्याच्या मते हे तंत्रज्ञान विमानात वापरले जाते. या यंत्रणेमुळे वाहन चालक वाहन बऱ्यापैकी नियंत्रणात ठेवू शकतो.निखिल यांनी ऑटोमोबाईलमध्ये डिप्लोमा केला आहे. यापूर्वी त्याने ‘फॉर्म्युला वन’ ही कार स्वत: तयार केली होती. तो सध्या वाहनांच्या सेफ्टी फिचरवर काम करतो आहे. फेसबुकवर त्याचे रोड अ‍ॅक्सिडेंट रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट नावाचे पेज आहे. यावर अपघाताची कारणे आणि ते कसे टाळता येईल यावर विश्लेषण करतो.विमान १४०, १८० च्या वेगाने पंखाच्या आधारे आकाशात उडते. याच टेक्नॉलॉजीचा वापर रुफ फ्लॅप ब्रेकींग सिस्टममध्ये करण्यात आला आहे. याचे पेटेंट केल्यामुळे वाहन कंपन्यांशी यावर चर्चा सुरू आहे.निखिल उंबरकर, रुफ प्लॅप ब्रेक सिस्टमचे निर्माता

टॅग्स :carकारResearchसंशोधन