शहरं
Join us  
Trending Stories
1
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
2
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
3
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
4
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
5
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
6
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
7
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
8
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
9
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
10
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
11
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
12
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
13
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
14
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
15
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
16
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
17
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
18
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
19
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
20
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   

नागपूरच्या मेडिकलमध्ये रोबोटिक सर्जरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 01:04 IST

‘राबोटिक सर्जरी’कडे आता नव्या अपेक्षेने पाहिले जात आहे. गरीब व सामान्य रुग्णांच्या आवाक्यात ही ‘सर्जरी’ आणण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने २५ कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे. यातील १६ कोटी ८० लाखांचा निधी प्रदान करण्यासाठी प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. या निधीची अर्थसंकल्पात तरतूद करण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. यामुळे लवकरच मेडिकलमध्ये रोबोटिक सर्जरीला सुरुवात होईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिली.

ठळक मुद्देपालकमंत्री बावनकुळे यांची ग्वाही : न्यूरोसर्जरी विभागाच्या अद्यावत शस्त्रक्रियागृहाचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘राबोटिक सर्जरी’कडे आता नव्या अपेक्षेने पाहिले जात आहे. गरीब व सामान्य रुग्णांच्या आवाक्यात ही ‘सर्जरी’ आणण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने २५ कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे. यातील १६ कोटी ८० लाखांचा निधी प्रदान करण्यासाठी प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. या निधीची अर्थसंकल्पात तरतूद करण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. यामुळे लवकरच मेडिकलमध्ये रोबोटिक सर्जरीला सुरुवात होईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिली.सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या न्यूरोसर्जरी विभागामधील अद्यावत शस्त्रक्रिया गृहाचा (मॉड्युलर ऑपरेशन थिएटर) लोकार्पण सोहळा गुरुवारी पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. मंचावर महानगरपालिकेचे सत्ता पक्षनेता संदीप जोशी, माजी महापौर प्रवीण दटके, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, न्यूरोसर्जरीचे विभागाचे प्रमुख डॉ. प्रमादे गिरी उपस्थित होते.बावनकुळे म्हणाले, नागपुरात ७० हजार कोटींची विकास कामे सुरू आहेत. हा विकास होत असताना आरोग्य क्षेत्राकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. पाच वर्षांपूर्वी आरोग्य व्यवस्था ढिसाळ होती. आता बरेच विकासात्मक बदल झाले आहेत. अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांच्या कार्यकाळात मेडिकल व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला चांगले दिवस आले आहेत. विशेष म्हणजे, जखमी रुग्णाच्या मेंदूला इजा झाल्यास त्याच्यावरील अद्यावत उपचारापासून ते शस्त्रक्रियेच्या सोयी मेडिकल व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. डॉ. प्रमोद गिरी यांच्या प्रयत्नांचे हे यश आहे.

 ‘न्यूरो नेव्हीगेशन’ यंत्रासाठी १.१८ कोटी रुपये

‘न्यूरो नेव्हीगेशन’ तंत्रज्ञान हे आजाराचे नेमके ठिकाण आणि शस्त्रक्रियेसाठी लागणारी नेमकी दिशा आणि ठिकाण दर्शवते. शस्त्रक्रियेसाठी योग्य दिशेने जाण्यास मार्गदर्शन करते. सर्वसामान्य लोकांसाठी या सुविधेचा वापर मोठा खर्चिक आहे. म्हणूनच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसारख्या शासकीय रुग्णालयात या यंत्रासाठी १.१८ कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे. सोबतच २५ व्हेन्टीलेटरसाठी २.८८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री बावनकुळे यांनी दिली. मेडिकलची प्रगतीकडे वाटचाल-डॉ. निसवाडेडॉ. अभिमन्यू निसवाडे म्हणाले, मेडिकलमध्ये एकेकाळी दोन हजार रुग्णांची असलेली ‘ओपीडी’ आज पाच हजारावर पोहचली आहे. आता ती सहा हजारावर नेण्याचा प्रयत्न आहे. उपलब्ध सोयी व तंत्रज्ञानामुळे हे शक्य होऊ शकले आहे. मेडिकलमध्येही सुपर स्पेशालिटीची ‘ओपीडी’ सुरू करण्यात आल्याने याचा फायदा रुग्णांना होत आहे. न्यूरोसर्जरीमध्ये ‘एमसीएच’ -डॉ. गिरीसुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या न्यूरोसर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. प्रमोद गिरी यांनी आपल्या प्रास्ताविकात म्हणाले, गेल्या दहा वर्षांत १७ हजार ‘न्यूरोसर्जरी’ करण्यात आल्या आहेत. हा आकडा फार मोठा आहे. म्हणूनच मेंदू शस्त्रक्रियेत ‘मॉड्युलर ओटी’ ही आज काळाची गरज झाली आहे. अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांच्या पुढाकारामुळे हे बांधकाम होऊ शकले आहे. आता न्यूरोसर्जरीमध्ये ‘एमसीएच’ अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रयत्न आहे. याचा फायदा या विद्यार्थ्यांसोबतच रुग्णांना होणार आहे.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयRobotरोबोट