आर्थिक तंगी दूर करण्यासाठी टाकला दरोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 12:42 AM2020-06-04T00:42:11+5:302020-06-04T00:43:36+5:30

लॉकडाऊन दरम्यान तीन महिन्यापासून वेतन न मिळाल्याने आर्थिक अडचणीचा सामना करणाऱ्या आरोपींनी १८ लाखाचा दरोडा टाकला. पोलिसांनी फरार आरोपी सुमन खंडेश्वर यालाही अटक केली आहे.

Robbery thrown to alleviate financial hardship | आर्थिक तंगी दूर करण्यासाठी टाकला दरोडा

आर्थिक तंगी दूर करण्यासाठी टाकला दरोडा

Next
ठळक मुद्दे१८ लाखाची लुट : आरोपींना ६ पर्यंत कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊन दरम्यान तीन महिन्यापासून वेतन न मिळाल्याने आर्थिक अडचणीचा सामना करणाऱ्या आरोपींनी १८ लाखाचा दरोडा टाकला. पोलिसांनी फरार आरोपी सुमन खंडेश्वर यालाही अटक केली आहे. यापूर्वी पोलिसांनी योगेश सत्रमवार, मंगेश पद्मगिरीवार, आकाश धोटे, निक्की ऊर्फ निखिल गोखले याला अटक केली. आरोपींनी १ जून रोजी दुपारी सिव्हील लाईन्स परिसरातील आमदार निवासाजवळ कॅश कलेक्शन कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून १८ लाख रुपये लुटले होते. गुन्हे शाखेने १० तासात घटनेचा खुलासा करीत आरोपींना अटक केली.
दरोड्याची टीप योगेश सत्रमवार याने दिली होती. तो एटीएमचा टेक्निशियन आहे. योगेशच्या म्हणण्यानुसार लॉकडाऊनमुळे त्याला तीन महिन्यापासून वेतन मिळाले नव्हते. आर्थिक चणचण भासल्याने त्याने दरोड्याची योजना आखली. ही योजना त्याने मंगेश पद्मगिरीवार याला सांगितली. मंगेश हा जीमचे उपकरण लावतो व दुरूस्तीचे काम करतो. जीम बंद असल्याने त्याला सुद्धा आर्थिक झळ सोसावी लागत होती. तोही तात्काळ तयार झाला. त्याने सुमन खंडेश्वर याला टीप दिली. कंपनीचे कर्मचारी व्यापाऱ्यांकडून रोख जमा करून बँकेत जमा करतात. सोमवारी कलेक्शन जास्त होते. त्यामुळे आरोपींनी सोमवारी लुटीची योजना आखली. दरोडा घातल्यानंतर आरोपी पैसे सुरक्षित ठेवण्याच्या तयारीत होते. त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना अटक केली. लॉकडाऊनमुळे अनेक लोक बेरोजगार झालो आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहे. पगारात कपात झाली आहे. कुटुंबाचा खर्च व जबाबदारी लक्षात घेता, येणाऱ्या दिवसात लुटपाटीच्या घटना वाढण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातून पोलीस सतर्क झाले आहे. आरोपींना ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Robbery thrown to alleviate financial hardship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.