मानेवाडा चौकात चाकुचा धाक दाखवून लुटमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:13 IST2021-09-05T04:13:03+5:302021-09-05T04:13:03+5:30

नागपूर : अजनी ठाण्यांतर्गत मानेवाडा चौकात दोन आरोपींनी चाकूचा धाक दाखवून दुकाने लुटल्यानंतर एक पेट्रोल पंप लुटण्याचा प्रयत्न केला. ...

Robbery at Manewada Chowk | मानेवाडा चौकात चाकुचा धाक दाखवून लुटमार

मानेवाडा चौकात चाकुचा धाक दाखवून लुटमार

नागपूर : अजनी ठाण्यांतर्गत मानेवाडा चौकात दोन आरोपींनी चाकूचा धाक दाखवून दुकाने लुटल्यानंतर एक पेट्रोल पंप लुटण्याचा प्रयत्न केला. एका दुकानातील काचेचा दरवाजा तोडून आरोपींनी नुकसान केले. ही घटना शनिवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान घडली.

मिळालेल्या माहितीनुसार दोन आरोपी बाईकवर नशा करून मानेवाडा चौकात पोहोचले. एक आरोपी चाकू दाखवून हॅपी फुड नावाच्या दुकानात घुसला. त्याने चाकूच्या धाकावर ८ हजार रुपये हिसकावून घेतले. त्यानंतर आरोपींनी पेट्रोल पंप लुटण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पोलिसांची गाडी पाहून आरोपी फरार झाले. त्यानंतर आरोपींनी ओमकारनगर चौकात शारदा डेअरी लुटण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलीस पाठलाग करीत असल्याचे पाहून चाकू टाकून देत आरोपी बेलतरोडी रोडवरील झुडपातून पळ काढत होते. परंतु पोलिसांनी पाठलाग करून दोन्ही आरोपींना अटक केली. वृत्त लिहिपर्यंत आरोपींची चौकशी सुरू असल्यामुळे त्यांचे नाव आणि पत्ता मिळू शकला नाही.

.........

Web Title: Robbery at Manewada Chowk